मा. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार शिष्टमंडळाने घेतली मुलांची विचारपूस
आरोग्य स्थिती स्थिर, विशेष लक्ष दिले जात असल्याची डॉक्टरांची माहिती
पारडीतील विषबाधित मुलांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट, उपचार सुर
चंद्रपूर/महाराष्ट्र
दि. 08 डिसेंबर 2024
आज चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पारडी येथील अन्नातून विषबाधित झालेल्या मुलांची भेट घेण्यात आली. ही भेट मा. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार घेण्यात आली. यावेळी मुलांच्या आरोग्य स्थितीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी मुलांवर आवश्यक ती उपचार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. डॉक्टरांनी सांगितले की, मुलांची स्थिती सध्या स्थिर असून त्यांच्या पूर्ण आरोग्य सुधारासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
या भेटीत महायुती शिष्टमंडळाचे डॉ. मंगेश गुलवाडे, बंडू हजारे, नितीन भटारकर, प्रकाश देवतळे, जयप्रकाश कांबळे, छबूताई वैरागडे, किरण बुटले, मनोज पाल, रुद्रनारायण तिवारी, धनराज कोवे, उमेश आष्टणकर, राकेश बोमनवार, रामकुमार आकापल्लीवार यांनी सहभाग घेतला.
डॉ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
डॉ. मुनगंटीवार यांच्या सामाजिक भानाने प्रेरित होऊन, प्रशासन आणि वैद्यकीय विभागाने संयुक्तपणे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीचे पाऊल उचलले आहे. मुलांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा होईपर्यंत विशेष लक्ष दिले जाईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
हा प्रयत्न प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, आणि लोकप्रतिनिधींनी मिळून केलेल्या एकत्रित कामगिरीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.