सुधीर मुनगंटीवारांची महत्त्वाकांक्षी घोषणा: मूल शहरात नवे पॉलीटेक्नीक कॉलेज सुरू होणार!
चंद्रपूर/महाराष्ट्र
दि. 04 नवेम्बर 2024
संवाददाता : अनुप यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनलची
सविस्तर बातमी: राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहराच्या शैक्षणिक वैभवात भर टाकण्यासाठी नवे पॉलीटेक्नीक कॉलेज सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे मूल शहर शैक्षणिक क्षेत्रात आणखी प्रगत होईल, असे त्यांनी सांगितले.
मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या शैक्षणिक सुधारणांवर प्रकाश टाकला, ज्यात गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी 263 कोटींचा निधी, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 1500 शाळांना ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
या नवीन पॉलीटेक्नीक कॉलेजामुळे मूल शहराच्या विकासात एक नवा अध्याय सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.