चंद्रपुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारजी महाविकास आघाडी साठी इच्छुक उमेदवार भानेश राजम मातांगी
चंद्रपूर 71 व विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारजी महाविकास आघाडी साठी इच्छुक उमेदवार भानेश राजम मातांगी यांचा अर्ज सादर
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि . ३१ अगस्त २०२४
सविस्तर बातमी:-चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भानेश राजम मातांगी यांचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक घटका साठी बहुमोलाचा योगदान करत आलेला आहे. आणि पक्षात सुद्धा अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत जबाबदारी पार पडत आहे. आणि महविकास आघाडीला गेल्या अनेक वर्षंपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळालेली नाही व मित्र पक्षातील उमेदवाराना या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 30 वर्षांपासून अपयशच आले आहेत .त्या संदर्भात ही विधान सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी ही मागणी आहे.
या चंद्रपूर क्षेत्रातील संपूर्ण जनतेकडून होत असलेल्या मागणी मुळे. समाज हिता साठी लढणारे सुशिक्षित व पक्षांची जबाबदारी संघटनात्मक कार्यप्रणाली असणारे भानेश राजम मातांगी यांनी.आज.दिनांक 31 अगस्त 2024 ला कार्याध्यक्ष तथा महिला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके व शहर जिल्हाध्यक्ष मा.दीपक बाबू जयस्वाल यांचा उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गट ची उमेदवारी मिळण्याकरिता अर्ज सादर करण्यात आलेले आहे. या प्रसंगी शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे शहर महासचिव सुहास पिंगे. माजी शहर उपाध्यक्ष मनोज बंडेवार. मानव अधिकार सायाता संघ चे जिल्हा महामंत्री संतोष शिरसागर. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत. आटो संघटना चालकांचे साराया पोटला . मजदूर संघटने अध्यक्ष कुमार पाल . असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.