शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्री वर भेटून दिल्या शुभेच्छा़..

42

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्री वर भेटून दिल्या शुभेच्छा़

युवासेना पुर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे युवासेना च्या वतीने सुरू असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक निशुल्क साहित्य बॅंक उपक्रमाबद्दल दिली माहीती

 

सविस्तर बातमी :- दिनांक 27/7/2024 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा,कुटूंब प्रमूख शांत, संयमी, संघर्ष योद्धा महाराष्ट्र राज्याचे माजी मुखमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदीवसानिमित्त मातोश्री मुंबई येथे युवासेना च्या वतीने भेट घेऊन शाल, श्रीफळ व विठ्ठल रुक्मिणी ची मुर्ती भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवासेना विदर्भ सचिव ,सिनेट सदस्य प्रा निलेश बेलखेडे यांच्या संकल्पनेतून युवासेना च्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक साहित्य निशुल्क बुक बॅंक या उपक्रमाबद्दल माहिती देत गरिब गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असून लोकसहभागातून हा उपक्रम सुरवात करण्यात आला आहे अशी माहिती दिली यावेळी पक्षप्रमुख यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल युवासेना पुर्व विदर्भ सचिव प्रा निलेश बेलखेडे यांचे व सहकार्यांचे अभिनंदन करीत अश्या सामाजिक कार्यात झोकून लोकसेवा करा व जनसामान्यांना सहकार्य करीत रहा मी सोबत आहे असा पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आश्वासित केले.

यावेळी युवासेना चंद्रपूर जिल्हा विस्तार सुर्या हिरेखन, युवासेना शहर अधिकारी चेतन बोबडे, कंत्राटी कामगार जिल्हाध्यक्ष अमोल मेश्राम, प्रफुल चावरे , मुकेश जक्कुलवार, दर्शन कोहळे, आदर्श लडस्कर यांच्या सह युवासैनिकांची मातोश्रीवर उपस्थिती होती.