ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात वढा तीर्थक्षेत्र येथील वारीचे स्वागत व अल्पोपार वाटप

59

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात वढा तीर्थक्षेत्र येथील वारीचे स्वागत व अल्पोपार वाटप

 

चंद्रपुर/महाराष्ट्र 

दि. 16 जुलाई 2024

रिपोर्ट :- अनुप यादव, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

सविस्चंतर चंद्रपूर – गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी साक्षात अनुभवणारे संतांनी ‘माझे माहेर पंढरी’ असे म्हणत जीवनाचे एक नाते प्रस्थापित केले आहे. ‘अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरेन तिन्ही लोक’ असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराज देखील वारी करायचे. तुकाराम महाराज यांचे पुत्र नारायण महाराज यांनी या सोहळ्यात पालखीचे सुंदर स्वरूप दिले. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखी ठेवून पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली.

 

आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी मंगळवारला सकाळी माता महाकाली मंदिरापासून निघालेल्या वारीत श्री. संत स्वामी चैतन्य महाराज यांच्या सह शेकडो वारकरी पालखी घेऊन टाळ, मृदंगाच्या आवाजात भजन, भारुड, संकीर्तन गात डोक्यावर तुळशवृंदावन घेऊन भगिनी व इतर सर्व वारकरी आनंदमय वातावरणात पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन फुगडी व रिंगणाच्या सुंदर प्रदर्शन करीत पायी निघाले. वारीचे गिरनार चौकात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात श्री. संत स्वामी चैतन्य महाराज व पालखीचे पुष्पवर्षाव करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीर्थक्षेत्र व समस्त ग्रामवासी वढा चे वारकरी, माता-भगिनी, बांधवांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले आणि अल्पोहार व चहा वाटप करण्यात आले.

 

तेव्हा भाजप अनु. जमाती जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा रवी चाहारे, जिल्हा सचिव राकेश बोमंनवार,उमेश आष्टनकर, संतोष भोसकर, प्रभाकर गोहकार, बंडू पुरकर, शंकर वडारकर, महेंद्र वडस्कर, मारुती हागे, सविता मसे, आशा मोहिजे, सविता गोरकार, आणि किरण बांदुरकर सरपंच नकोडा, तनुश्री बांदुरकर माजी सरपंच नकोडा, सुलभा साव, सुरेश वाडकर, सदस्य ग्रामपंचायत वढा विकास हागे, बाबा चेणे यांची उपस्थिती

होती.