शिंदे सरकार तर्फे घोषित योजनांचा लाभ घ्यावा..

37

शिंदे सरकार तर्फे घोषित योजनांचा लाभ घ्यावा..

पत्रपरिषद मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख बंडु हजारे ची माहीती..

चंद्रपुर/महाराष्ट्र 

दि. 03 जुलै 2024

सविस्तर बातमी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी, शेतमजुर कामगार महिला, दुर्बल घटकांसाठी अनेक योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे. यामुळे राज्यातील जनता व विशेष करून महीलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिंदे सरकार तर्फे घोषित योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना जिला प्रमुख बंडु हजारे ने सोमवारी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरीषद मध्ये केले आहे.
शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला गेला. राज्यातील 2 लाख 5 हजार मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिन्याकाठी दीड हजार रूपयांची थेट मदत, महिलांना वर्षातून तीन मोफत सिलिंडर, शेतकरीला कृषिपंपाला मोफत वीज, मागेल त्याला वीज, मागेल त्याला सौरउर्जा पंप, दुधाला लीटरमागे पाच रूपये अनुदान अशा घोषणा महायुती सरकार ने 25व्या अर्थसंकल्पात केल्या. अर्थसंकल्पात मायमाऊली व बळीराजासाठी घोषणा आणि निधीचा प्रचंड वर्षाव करण्यात आला अशी माहिती हजारे यांनी दिली.

शिंदे सरकार ने पावसाळी अधिवेशनामध्ये जनतेच्या उपयोगाचे निर्णय घेतल्याने लाडकी बहीण या योजने अंतर्गत प्रयेक महिलेला १५००/- मिळणार आहे. या योजनेसाठी महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी एकदम साध्या आणि सोप्या अटी ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे या योजनांचा राज्यातील महिलांना फायदा होणार आहे. तसेच १७ शहरांमध्ये महिलांना पिंक रिक्शा साठी अनुदान सुध्दा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नोंदणीकृत विवाह करणारे महिलांना रू. १०,०००/- रूपया ऐवजी रू. २५,०००/- अनुदान मिळणार आहे. तसेच ८ लक्ष वार्षिक उत्पनाची मर्यादा तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थीनींना पदवी शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क माफ होणार असल्याने असा मुख्यमंत्री पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळालेला आहे अशी माहिती हजारे यांनी दिली. जिल्ह्यातील महिलांना व जनतेला या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बंडु हजारे ने केले आहे.

पत्रपरीषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख बंडु हजारे, जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, जिल्हा संघटक युवराज धानोरकर, प्रतिमा ठाकुर, शहर प्रमुख भारत गुप्ता, मिनल लाही आदि उपस्थित होते.
———————————–