• साकोलीत पॅथॉलॅब चाचणीचा फंडा..अनं २४०० रू. नी गंडा.!

96

🛑साकोलीत पॅथॉलॅब चाचणीचा फंडा..अनं चोवीसशेनी गंडा

🛑पॅथोलॅब संचालकांची रूग्णांकडून अतोनात लूट ; अखेर केले अतिरिक्त उकळलेले पैशे परत

📡 साकोली / महाराष्ट्र
22. 05. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी – साकोली : जेथे नियमाने ४ ते ५ चाचणीसाठी १४०० जवळपास लागतात तेथे चक्क २४०० रू रूग्णांकडून उकळीत साकोलीत पॅथॉलॅब चाचणीचा नवा वसुली फंडा काही संचालकांनी सुरू केला असून सोमवारी २२ मे च्या एका घटनेत यांचे पितळ उघडे पडताच त्या गरीब रूग्णांचे पैशे अखेर त्या पॅथोलॉजी लेबॉरटरी संचालकांनी परत केले. यांवर अतोनात शुल्क वसुली प्रकरणी आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊले उचलावी अशी भुक्तभोगी रूग्ण जनतेने केली आहे.
सविस्तर की, सोमवार दि. २२ मे २०२३ स. १०:१५ दरम्यान उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे महिला रुग्ण सरोज देवेंद्र सावसाकडे ४७ रा. कुंभली व इतर दोन रुग्णही दाखल होते. यादरम्यान त्यांना वैद्यकीयांनी सीबीसी, बीसीटीसी, पीटीआयएमआर, एचआरके, एचबीएस अश्या ५ चाचण्या सांगितल्या. पश्चात शहरातील शिवाजी वार्ड मधील एका पॅथोलॉजी लेबॉरटरी मधून एक महिला येत त्यांचे रक्त व इतर नमुने घेऊन त्यांकडून प्रत्येकी २४०० रू घेत निघून गेल्या. मात्र काही जाणकार रूग्ण जनतेच्या मनात शंका निर्माण झाली की या चाचणीला तर अंदाजे १२०० ते १४०० रू लागतात तसेच त्यांनी येथे चाचणी विभागातील श्री रामटेके यांना विचारले त्यांनी त्या पॅथोलॉजी लेबॉरटरी संचालक महिलेला फोनवर सांगितले की रक्कम जास्त का घेतली सदर अतिरिक्त घेतलेले पैशे त्या त्या रुग्णांना परत करा. ही पॅथोलॉजी लेबॉरटरी एका चाचणी विभागातीलच समंधीताची असल्याने प्रकरण चव्हाट्यावर आलेले पाहून त्यांनी अतितातडीने त्या रूग्णांकडून घेतलेल्या २४०० रू. पैकी १२०० रुपये रूग्णालयात आणून परत दिले. विशेष की हा सर्व खेळ एक जाणकार रूग्ण व “दैनिक युवाराष्ट्र दर्शन प्रतिनिधी” यांच्या पोलखोल ऑपरेशननेच सुरू होता हे विशेष. कारण इतर पॅथॉलॅब सेंटरवरून विचारले असता सदर सर्व चाचण्यांना किमान १२८० रू असाच खर्च येत असून मग गोरगरीब रूग्णांकडून अतोनात रक्कमेची सक्तीची वसुली का.? असा संतापजनक प्रश्न रूग्णांकडून घटनास्थळी विचारला जात होता. तेवढ्यात “दैनिक युवाराष्ट्र दर्शन” प्रतिनिधीने वैद्यकीय कक्षात आलेल्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राकेश नंदेश्वर यांना याबाबद आपली प्रतिक्रिया विचारली असता “मी यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही” म्हणून निघून गेले. आता धक्कादायक प्रकार हा की शासकीय रूग्णालयात खाजगी पॅथोलॉजी लेबॉरटरी संचालकांना येऊन रूग्णांच्या बेडवरून रक्त, मलमुत्र, थुंकी इतर नमुने घेण्यासाठी परवानगी कुणाची.? यावर पॅथोलॉजी लेबॉरटरी संचालक मालक रामटेके यांनी “दैनिक युवाराष्ट्र दर्शन” प्रतिनिधीला सांगितले की चुकीने रूग्णांकडून २४०० रू घेतले होते पण त्यांना पैशे आम्ही परत केले व यापुढे अशी चुकी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊनच कार्य करू असे आश्वासनही दिले. अश्या पॅथोलॉजी लेबॉरटरी संचालकांनी साकोली शहरातील विविध जागी अतोनात चाचण्या करण्यासाठी बेहिशोबी व अतोनात रक्कमेची सक्तीची वसुली यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ठोस पाऊले उचलावी अशी मागणी रूग्णांकडून व नातेवाईक जनतेकडून करण्यात आली आहे.