🛑अनेक आमदारांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे सुरू आहे पाठपुरावा
📡 साकोली / महाराष्ट्र 18. 05. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
🔳सविस्तर बातमी : साकोली : महाराष्ट्र दिनापासून राज्यात नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती होणार अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये वेगाने प्रसारण होत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती होणार असून विदर्भातील ब्रिटीशकालीन राजवटातील सर्वात जूनी असलेली मुख्य तहसिल साकोलीलाही जिल्हा तयार करण्यासाठी नविन २२ जिल्ह्यातील यादीत साकोलीला स्थान दिले आहे. याबाबद महाराष्ट्रातील नवनिर्माण २२ जिल्ह्यातील अनेक आमदारांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे.
यात विशेष म्हणजे विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून ब्रिटिशकालीन राजवटातील असलेली सर्वात जूनी तहसील साकोली हा जिल्हा तयार केला जाणार आहे. कारण भंडारा जिल्ह्यातील पूर्वी भंडारा, साकोली व गोंदिया हे तिनच तालुके व उपजिल्हा आणि दिवाणी अपर ( उच्च श्रेणी ) न्यायालय असून गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज ( वडसा ) पासून देवरी, कुरखेडा ( गडचिरोली ), चिचगड येथून आपल्या न्यायालयीन प्रकरणांसाठी मध्यवर्ती साकोली न्यायालयात पक्षकार व वकील मंडळी येत असे. याकरीता सर्वात जूनी ऐतिहासिक तहसील साकोलीला जिल्हा तयार करणे हेच प्रथम उद्देश असल्याचे साकोली आमदार नाना पटोले यांनी मागे सांगितले व याकरीता तीव्र गतीने मोर्चेबांधणी सुरू असून लवकरच साकोली हा जिल्हा संपुष्टात येईल व याचा फायदा २५ ते ३० किलोमीटर अंतरावरील मुख्य गावातील सर्व जनतेला साकोली हे मध्यवर्ती ठिकाण उपयुक्त ठरेल असेही ते म्हणाले.
अन्य जिल्हा निर्मितीत महाराष्ट्रातील प्रस्तावित २२ नवीन जिल्ह्यांमधे अहमदनगर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांची निर्मिती, पालघरचे विभाजन करून जव्हार हा जिल्हा बनवणे,
ठाणे जिल्हा विभाजन करून मीरा भाईंदर, कल्याण हे दोन नवीन जिल्हे बनवणे, पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करणे, विशेष बाब म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या जिल्ह्याची मागणी केली आहे. इतरही आमदारांच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड जिल्हा तयार करणे, सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा, बीड जिल्हा विभाजित करून आंबेजोगाई हा जिल्हा, लातूर मधून उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा तयार होणार, जळगावमधून भुसावळ अन बुलढाणामधून खामगाव हे जिल्हे तयार होणार, अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा तयार केला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून ब्रिटिशकालीन राजवटातील असलेली सर्वात जूनी तहसील साकोली हा जिल्हा तयार केला जाणार आहे. याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा जिल्हा, आणि गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे. याबाबद महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत मागेही याबाबद तारांकीत प्रश्नांनी हा मुद्दा रेटून धरला होता. त्याचबरोबर नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसोबत क्षेत्रातील माजी विधानपरिषद आमदार डॉ. परीणय फुके यांनीही हा रास्त विषय मांडून साकोली हे मुख्यालय आणि मध्यवर्ती शहराविषयी दिर्घ चर्चा केली आहे.