• साकोली शहर काँग्रेस कमिटी नवे अध्यक्ष दिलीप मासूरकर यांनी पदभार स्वीकारला

83

साकोली शहर नवे काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप मासूरकर यांनी पदभार स्वीकारला

महात्मा गांधी चौकात युवकांच्या जल्लोषात स्वागत व दिल्या शुभेच्छा

📡 साकोली / महाराष्ट्र
15. 05. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

⭕ सविस्तर बातमी : साकोली – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या आदेशानुसार आणि भंडारा जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या सुचनेनुसार साकोली शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी येथील दिलीप मधुकरराव मासूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीने साकोली सेंदूरवाफा शहरातील युवा वर्गात उत्साह संचारला असून येत्या नगरपरिषद निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष शिखर गाठून सत्तेची विजयश्री खेचून आणित नगरपरिषदेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवू असा ठाम विश्वास स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी साकोली जूने पंचायत समिती गांधी चौकात ( १५.मे.) ला व्यक्त केला आहे.
दिलीप मासूरकर यांचा ३० वर्षीय निस्वार्थी कॉंग्रेसचा प्रवास असून ०१/११/१९९५ ला शहर युवक काँग्रेस अध्यक्ष, २५/१२/१९९९ पासून एन एस यु आय भंडारा जिल्हा अध्यक्ष, ०३/०२/२००५ ला जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष व नुकतेच भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव व उपाध्यक्षही होते. दिलीप मासूरकर यांना कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ११ ऑगस्ट २००४ ला “बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट” हा सुद्धा राष्ट्रीय आयएनसी अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. दिलीप मासूरकर यांनी पक्षाच्या विविध पदांवर राहून एन एस यु आय, युवक काँग्रेस इत्यादी राज्य व राष्ट्रीय अधिवेशनात हजारोंच्या संख्येने युवा कार्यकर्त्यांसह सहभागी होऊन मुंबई, दिल्ली, नाशिक, हैदराबाद, पुणे येथे भंडारा जिल्ह्याचे दमदार नेतृत्व सांभाळले हे विशेष.
दिलीप मासूरकर यांच्या साकोली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातील युवकांनी आज १५ मे २०२३ ला स. ११ वा. जूने पंचायत समिती गांधी चौकात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व महात्मा गांधी प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक रूपचंद टेंभुर्णे, मोहन बोरकर, दिलीप निनावे, संदीप बावनकुळे, नयन पटेल, अफजल खान, सोनू बैरागी, सतिश रंगारी, विजय दूबे, विनायक देशमुख, ओमप्रकाश गायकवाड, दिपक थानथराटे, उमेश भुरे, जावेद शेख, सचिन लिचडे, राजू देशमुख, पं.भास्कराचार्य खोब्रागडे, नंदू गेडाम, पराग कोटांगले, विलास मासुरकर आदींनी नवे शहराध्यक्ष दिलीप मासूरकर यांचे हार्दिक स्वागत करीत पुढील दमदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्यात.