🛑 महिलांनो आपले दागिने सांभाळा
🔳 साकोली पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात यांचे आवाहन
🔳 साकोली / महाराष्ट्र
09. 05. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
◾ साकोली : सध्या लग्नसमारंभाची धूम असून मांगलिक कार्यक्रमात आपल्याकडे किती तोळे सोने चांदी आहे हे काही महिलांना मिरवून दाखविण्यासाठी हौस व स्पर्धा असते पण या स्पर्धेत चोरट्यांची तुमच्या आभूषांवर नजर असते यातच हे दाखवेपणा प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकते. करीता साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी विनंती आवाहन केले की तुमची क्षणांची समयसुचकता हिच तुमची सुरक्षा असून महागडे दागदागिने घालून जातांना अतिसावध राहण्याची गरज आहे असे “ग्लोबल महाराष्ट्र न्यूज” शी बोलतांना केले.
लग्नसमारंभात, वास्तूपुजन, स्वागत समारंभ तसेच विविध मांगलिक कार्यक्रमात महिला महागडे दागदागिने घालून कार्यक्रमात गर्दीच्या ठिकाणी मिरवित असतात. पण काही सदर समारंभ पाहून इतरत्र चोरटे हे तुमच्या दागदागिन्यांवर नजर ठेवून असतात व नजर चूकताच दागदागिन्यांवर अगदल हात साफ करतात. अश्यांना पोलीस विभागाने विनंती आवाहन केले आहे की शक्यतो महागडी दागदागिन्यांच्या जागी साधी बेन्टैक्स आभुषणेही घालू शकता, सोनं चांदीचे दागदागिने घालून आपण खबरदारी घेत समारंभात वरातीत नृत्य अश्या घोळक्यात जाणे टाळावे, परीधान केलेल्या दागदागिन्यांवर ओढणी वस्त्र झाकून ठेवावे. तसेच बसस्थानक येथे बसमधे अगोदर जागा पकडण्यासाठी दरवाज्याच्या जवळ गर्दीत जाणे टाळावे. बसस्थानक प्रशासनालाही आवाहन केले जाते की बसस्थानक येथे चौकशी मंचावरून वारंवार सावधान संकेत व बस जवळ सावध राहण्याबाबद अलाऊंसमेन्ट करावेत. कारण आपली समयसूचकता हिच आपल्या मौल्यवान वस्तूंची सुरक्षा आहे याकरीता पोलीस विभागाला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी केले आहे.