🔳.. आणि निरोप देतांना शिक्षकांसह विद्यार्थीही झाले भावूक
▪️साकोली जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप व स्वागत
▪️साकोली / महाराष्ट्र
▪️06. 05. 2023
▪️रिपोर्ट • आशिष चेडगे ▪️• उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
📕 सविस्तर बातमी :- साकोली : शहरातील सर्वात जूनी व सन १८६० पूर्वीची स्थापित ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद केंद्रीय उच्च वरीष्ठ प्राथ. शाळा क्र. ०१ ( सेमी इंग्लिश ) येथे काल ( ०६.मे.) ला विद्यार्थ्यांचा वार्षिक सत्र निकाल जाहीर करण्यात आला. आणि सर्वांना गुणपत्रिका व प्रमाणपत्र प्रदान करीत येथून ८ वीत जाणा-या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी सर्व भावूक झाले होते.
Read more news 👇👇👇
सदर जिल्हा परिषद केंद्रीय उच्च वरीष्ठ प्राथमिक शाळा क्र ०१ येथील इयत्ता १ ते ७ मधील वार्षिक परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. आयोजित शालेय शिक्षण पालक सभेला मान्यवरांनी वर्ग ७ मधील विद्यार्थ्यांना ८ वीत जाणा-या प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात व कौतुकाभिनंदन करीत या शाळेतून निरोप देतांना शिक्षकांसह विद्यार्थीही भावूक झाले होते हे उल्लेखनीय. तसेच वर्ग १ ते ६ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना क्रमवार इयत्ता प्रवेशासाठी त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. पालकसभा व प्रशस्तीपत्र प्रदान कार्यक्रमाला मुख्याध्यापक डि.डी. वलथरे, सहा. शिक्षक आर. आर. बांगळे, एम. व्ही. बोकडे, टि. आय. पटले, सौ. आर.एल. बिसेन, सौ. वलथरे मैडम, कार्तिक साखरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष लिना चचाने, सदस्य हेमंत भारद्वाज, आशिष चेडगे, अमित लांजेवार, मंगेश भुरे, गजापूरे, रामदास आगाशे, व इतर हजर होते. विशेष की ७ वीतील शिकणा-या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या शाळेत ७ वर्ष राहून शिक्षकांचा व्यवहार आईवडीलांसारखे मुलांना रागावणे, वर्गात शिक्षणासोबतच मनोरंजन करणे, स्नेहसंमेलनात सामुहिक भाग घेऊन सर्वांचा आनंद द्विगुणित करणे अश्या अनमोल आठवणी घेऊन सातवीचे विद्यार्थी आज या शाळेतून बाहेर पडतांना निरोप समारंभात अक्षरशः भारावून जात क्षणार्धात डोळ्यात पाणी आणले होते हे उल्लेखनीय. पालकसभेत संचालन शिक्षक आर. आर. बांगळे तर आभार प्रदर्शन आशिष चेडगे यांनी केले.