साकोलीत उमरी लवारी घाटांवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत महसुलवर पडतो दररोज वाळूंचा दरोडा
सेंदूरवाफा लवारी रोडवर पहाटे सुसाट ट्रैक्टरांनी बचावले नागरीक ; शासनास लाखोंचा चुना ; प्रशासन झोपेत
साकोली / महाराष्ट्र
23. 04. 2023
रिपोर्ट आशिष चेडगे • उपसंपादक – ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया
सविस्तर बातमी :- साकोली : तालुक्यातील लवारी, उमरी, धर्मापूरी चुलबंद रेतीघाटांवरून मध्यरात्री पासून ते पहाटेपर्यंत २५ ते ३० ट्रैक्टरांनी अवैध वाळूचा मोठा दरोडा पडीत असून शासनाच्या महसुलास चुना पोतून रेती विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. या चोरी प्रकरणी महसूल विभागास माहितही असून का कारवाई व कोणत्या हप्ताबांध योजनेमुळे शांतमय बसले आहेत व सर्रास शासकीय नियमांचे उल्लंघन केले जाते आहे. दि. २१ एप्रिलला पहाटे ५ सुमारास सेंदूरवाफा – लवारी रोडवर रेतीचोरी करून सुसाट पळविणाऱ्या ट्रैक्टरमुळे सकाळी फिरायला जाणारे नागरीक थोडक्यात बचावले. त्या नागरीकाची मिडीयाजवळ रिकार्ड संभाषण पुरावा ही आहे.
Read more news 👇👇👇
ट्रकच्या धडकेत महिला घटनास्थळी ठार निर्माणधीन वन्यमार्ग उड्डाणपूल मोहगाटा जंगल महामार्गावरील घटना
साकोली शहरासह ग्रामीण भागातील निर्माणधिन कामांवर मध्यरात्रीपासूनच सेंदूरवाफा व परीसरातील २५ ते ३० ट्रैक्टरांनी अवैध वाळूची तस्करी होत आहे. ट्रैक्टर्स चालक मालक एका ट्रॉलीत हजारोंच्या वर ब्रॉसटन वाळूचा उपसा करून सर्रास दररोज रेतीघाटांवर दरोडा टाकीत आहेत. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत साकोली शहरासह ग्रामीण क्षेत्रातील नवनिर्माणधिन कामांवर वाळू उतरविले जाते. हा गैरप्रकार काही महिन्यांपासून सर्रासपणे सुरू आहे. यात सेंदूरवाफा व साकोलीतील काही रेती पुरवठा ठेकेदार बड्यांचा हात असून वरदहस्त शासकीय कर्मचारी यात गुंतलेले असल्याची नागरीकांनी गुप्त सुचना दिली आहे. या गैरप्रकारामुळे तहसील महसूल विभागास दररोज लाखोंचा चुना लागत असून मात्र काही बडे अधिका-यांची दररोज चांगलीच दिवाळी होत आहे. या गैरप्रकारात ठेकेदार, चालक, मालक व निर्माणधीनांमध्ये मध्यरात्रीपासूनच छुपामार्ग व बांधकाम जागेबाबत दूरध्वनीवरून संभाषण सुरू असल्याचे चित्र साकोली तालुक्यात दिसत आहे. दि. २१ एप्रिलला सकाळी ५ वाजता एक नागरीक ( गुप्त नाव – दूरध्वनीवर संभाषण रिकार्ड पुरावा ) यांनी सांगितले की सेंदूरवाफा ते लवारी रोडवर सकाळी फिरायला जाणारे नागरीक या सुसाट पळविणाऱ्या ट्रैक्टरमुळे थोडक्यात बचावले आहेत. या जिवघेण्या संतापजनक प्रकाराने काय महसुल व पोलीस कुंभकर्णी झोपेत आहे असाही सवाल जनतेने उपस्थित केला. या गैरप्रकारामुळे शासनाच्या तिजोरीला चूना लागत आहे तरीही पोलीस व तहसील-महसूल प्रशासन का कुंभकर्णी झोपेत आहे हा विचित्र प्रश्न आजही गुलदस्त्यातच असून दररोज दिवाळी साजरी करणारे ते सर्व अधिकारी व माफीया कोण याकडे जनतेचे लक्ष केंद्रीत असून नागरीकांनी हा सुसाट पळविणाऱ्या ट्रैक्टरमुळे सकाळी होणा-या संभावित अपघातांवर आळा घालण्यासाठी यांची पायबंदी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
प्रतिक्रिया :-
“आम्ही रोज पहाटे लवारी रोडवर फिरण्यासाठी जात असतो हे रेती ट्रैक्टरवाले ऐवढ्या जोरानी ट्रैक्टर कट मारीत पळवितात की अंगावर आणतात की काय.? सोबत असंख्य महिलाही फिरायला या रोडवरून जातात यांसोबत या गुंडेगिरी सुरू असलेल्या ट्रैक्टर चालकांकडून कोणतीही जिवीतहानीचा भयानक प्रकार घडला तर जबाबदारी कुणाची, हा प्रकार तातडीने बंद व्हायला हवा ”
— एक सुजाण नागरिक ( दूरध्वनीवर संभाषण रिकार्ड – २१/०४/२०२३ )