CSTPS मधील पाईप कन्वेअर बेल्ट वरील सर्व कामगारांचा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटनेला पाठींबा.

93

CSTPS मधील पाईप कन्वेअर बेल्ट वरील सर्व कामगारांचा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटनेला पाठींबा

६२ कामगारांचा कंत्राट असून या मध्ये एकूण ९४ कामगार काम करत आहे.?

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 19 अप्रैल 2023
रिपोर्ट:- जिल्हा संवाददाता चंद्रपुर

सविस्तर बातमी:-  कामगार संघटना विशेष (सी.एस.टी.पी.एस.) प्रशासनाची व कंत्राटदाराची चाटू गिरी करणाऱ्या चार ते पाच संघटनेला शेवटचा निपोप देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटनेला पाठींबा व प्रवेश चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे असणारे तसेच भारतातील प्रथम क्रमांकावर असणारे औष्णिक वीज केंद्र म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची (CSTPS) एक आगळी वेगळी ओडक आहे.

 

६२ कामगारांचा कंत्राट असून या मध्ये एकूण ९४ कामगार काम करत आहे.?

सुमारे दोन वर्षा आधी CSTPS मध्ये सुरू झालेले पाईप कणवर बेल्टचा प्रकल्प कोट्या, करबो अर्बो खर्च करून हाच प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प इथे स्थापन केला गेला.या मध्ये थायसन इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १५ ते १७ करोड आभाळजनक असा प्रशासकीय नियमित इस्टिमेट मध्ये ६२ कामगार वर्क ऑर्डर पारित करून हा WCL तिर्वंजा ते CSTPS कोयना गेट पर्यंत एकूण बेल्ट चे अंतर हाती आलेल्या माहिती नुसार सुमारे ७: ५०कि.लो. मीटर पर्यंतचा कंत्राट देण्यात आला. या कंत्राट मध्ये वर्क ऑर्डर नुसार ६२ कामगारांचा कंत्राट असून या मध्ये एकूण ९४ कामगार काम करत आहे .पण मागील दोन महिन्या पासून रात्रीच्या सुमारे पूर्ण बेल्ट फाटला असून प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.

नोटीस न देता कामावरून बंद केले.!

अद्याप कंत्राटदारावर कुटलीही कार्यवाही न करता संपूर्ण कामगार यांना अनियमित प्रकार दर्शवित नोटीस न देता कामावरून बंद केले असता.कामगारांनी अनेक संघटनेशी संपर्क केला पण इतर चार पाच संघटनांनी उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांचा फायदा घेत आपला राजकीय हेतू काडून घेतला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र अंतर्गत भागात कामगारांनी माहिती घेत चंद्रपूर शाखा संघटनेचे सचिव श्री.प्रमोद कोलारकर यांच्या सोबत संपर्क साधला ही बाब लक्षात घेत संघटनेचे सन्माननीय राज्य अध्यक्ष श्री. रवीभाऊ शिराळकर साहेब,राज्य सचिव रामकृष्णजी चिखलकर साहेब, तसेच अमरावती डॅशिंग, तडफदार जिल्हाप्रमुख सन्माननीय. मोहम्मद वासिक भाऊ यांना माहिती देण्यात आली .

तसेच चंद्रपूर जिल्हा सचिव श्री.अमोल भाऊ मेश्राम , तसेच चंद्रपूर शाखा अध्यक्ष श्री.प्रफुल सागोरे यांना माहिती देत चंद्रपूर शाखा संघटनेच्या वतीने सर्व आज दिनांक १२/०४/२०२३ ला प्रशासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली .चार ते पाच संघटनेला शेवटचा निरोप देत कामगारांनी एकच संघटनेची निवड करतआपल्या संघटनेचे सदस्य झाले असून समोरील संघटनेच्या वाटचालीस एक मताने पाठींबा जाहीर केला म्हणातात ना आपले कामे प्रामाणिक असेल तर कुठे तुम्हाला जायची गरज नाही संघटनेचे नाव आणि संघटनेच्या पदाधिकारी यांची मार्केटिंग करायची गरज नाही आपल्या संघटनेची चंद्रपूर मध्ये या पाच ते सात वर्षांमध्ये केलेल्या कामाची ही पावती आहे..