गणतंत्र दिवशी जनतेला उत्कृष्ठ जीवन विमा प्रदात्यांचा शाखेतर्फे गौरवसत्कार 

129

गणतंत्र दिवशी जनतेला उत्कृष्ठ जीवन विमा प्रदात्यांचा शाखेतर्फे गौरवसत्कार 

साकोली शाखेत सत्कार सोहळा संपन्न

साकोली/महाराष्ट्र
दि. 26 जानेवारी 2023
रिपोर्ट:- साकोली संवाददाता

सविस्तर बातमी  साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखेत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण शाखाधिकारी कळमकर यांचे हस्ते संपन्न झाले. आयोजित एल आय सी सभागृहात गणतंत्र दिवस स्पर्धेत मुख्य विमा सल्लागार पुजा कुरंजेकर सी एल आय ए यांच्या ग्रुपला चंदु लिखार सहाय्यक यांच्या मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून या मार्गदर्शनामुळे ग्रुप अभिकर्त्यांनी स्पर्धेत १०४ पॉलिसी पुर्ण केल्या. अर्चना उके यांनी साकोली शाखेत २७ पॉलिसी करीत स्पर्धेत प्रथम स्थानावर बाजी मारली, ( २६.जाने.) ला संपन्न या सोहळ्याला त्यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी साकोली शाखेचे शाखाधिकारी कळमकर, लाखनी शाखेचे पाठराबे, सहा.शाखाधिकारी उमेश लिंगलवार, सहा.शाखाधिकारी किशोर डोंगरे व एल आय सी साकोली शाखेचे सर्व कर्मचारीवृंद सोहळ्याला उपस्थित होते.

और देखें 👇👇👇

खेल खिलाड़ी का पैसा मदारी का.!!

मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक जनतेच्या पुढील भविष्याची काळजी घेत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना समोर काही आर्थिक त्रास जाणवणार नाही हेच “योगक्षेम वहाम्यहम्” या ब्रिदवाक्याचा प्रत्येकांनी बोध घेत भारतीय आयुर्विमा महामंडळाचे हर घर विमा या ध्येयातून “सर्वसामान्यांना आधार यातूनच भविष्याचा विचार” हा आपण संकल्प मनात ठेवून कार्यकुशलतेने आपले ध्येय साध्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. सत्कारात प्रमोद गजभिये २० पॉलिसी, रोशन कापगते १७ पॉलिसी, प्रमोद ठाकरे ११ पॉलिसी यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे पुजा कुरंजेकर यांचा एल आय सी मिशन समुह साकोली शाखेत गणतंत्र दिवस स्पर्धेत प्रथम स्थानावर आला. मुख्य विमा सल्लागार पुजा कुरंजेकर यांनी या यशाबद्दल पुर्ण श्रेय समुहातील अभिकर्त्यांना व शाखेतील समुहाचे मार्गदर्शक चंदु लिखार यांना दिले आहे.