ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
घुग्घुस प्रतिनिधी
सविस्तर बातमी:– सोमवार, दि. ०५ जूलै. आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांवर सपशेल खोटे आरोप लावून असे निलंबन करणे, हे निषेधार्थ आहे.
खरेतर कामकाजावेळी तालिका सभापती, शिवसेना नेते भाष्कर जाधव यांना भाजप आमदारांकडून कोणतीही शिवीगाळ करण्यात आलेली नाही.
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर मविआ सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याने विरोधक वरचढ होतांना पाहून, विरोधकांची संख्या कमी करून नेमक्यावेळी आपल्यावर होणारी टीकेची झोड कमी करण्यासाठी आणि भाजपच्या आक्रमकतेच्या भितीपोटी आज हे निंदनीय निर्णय घेतल्या गेले आहे. या निर्णयाचा आम्ही भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो.
असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना केले.
तसेच, राज्यातील जनतेचे सुड घेण्यासाठी सत्तेवर आलेल्या आणि नाकर्तेपणाचे कळस गाठलेल्या या महाभकासतिघाडी सरकारकडून असले रडीचे डाव होणे सहाजिक आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावला.