आठ ठिकाणी आंदोलन
चंद्रपूर : आज सकाळी घुग्घुस येथील गांधी चौकात चंद्रपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सरपंच संतोष नुने, पुंडलीक उरकुडे व दिलीप कांबळे यांचे सह काळ्या फिती लावुन आंदोलन केले.
कोरोना खबरदारीच्या प्रभावी उपाययोजना करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे.
म्हणुन “मेरा आंगन मेरा रणांगण ” हे आंदोलन करुन ठाकरे सरकार चे अपयश जनते पर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करत आहो.
केंद्र सरकार ने पॅकेज जाहिर केले परंतु महाराष्ट्र सरकार ने पॅकेज जाहिर केले नाही. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार ने प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केले पाहिजे. लोकांचा रोजगार बुडाला आहे त्यांना ही पॅकेज जाहिर करा. बारा बलुतेदारांना पॅकेज जाहिर करा. मेडिकल व पोलीस यांच्या साठी उपाय योजना नाही त्यामुळे सर्व आघाडीवर हे ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे.
शेतकऱ्यांचा कापुस घरीच राहला तर ते संकटात येईल, कापुस खरेदी झाली पाहिजे.आज घुग्घुस येथे सोशल डिस्टंसींग ठेऊन आठ ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे असे चंद्रपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे या वेळी म्हणाले.
घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी बाजारा जवळ, चंद्रपुर जि.प महिला व बाल कल्याण सभापति नितुताई चौधरी यांनी बहादे प्लाट जवळ, चंद्रपुर पंस उपसभापति निरीक्षण तांड्रा यांनी इंदिरा नगर, ग्रापं सदस्य राजकुमार गोडसेलवार यांनी रामनगर, ग्रांप सदस्य साजन गोहने यांनी बस स्थानक जवळ भाजपा नेते विनोद जिंजर्ला यांनी तिलक नगर येथे आंदोलन केले.