अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कैलाश नगर माथोली व जुगाद या गावात चौकी देण्याची मागणी

422

यवतमाल/महाराष्ट्र

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

घुग्घुस  प्रतिनिधी :- आज मथोली , जुगाद ,कैलाश नगर ग्रामपंचायत येथे ॲड प्रतीक्षा अरुण देऊळकर ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने दिनांक 12 -5-2021 ला सरपंच मॅडम कोरांटाइन असल्या मुळे सचिव साहेबांना निवेदन देण्यात आले पोलिस चौकी माथोली गावात लावण्या बाबत , कैलाश नगर माथोली व जुगाद या तीन गावानंच्या मधात दोन बिअर बार व एक देशी दारू भट्टी आहे.

लोक कैलाश नगर कॉलनी मधे कुठेही बसून दारू पेतात

  • इतर जिल्ह्यातील दारू बंधी असल्या मुळे बाहेरचे लोक इथेच दारू पेण्या साठी किव्हा कोरोना काळात पार्सल नेण्या साठी येत आहे ,ते लोक कैलाश नगर कॉलनी मधे कुठेही बसून दारू पेतात व शिविगाळ करतात व महिलांना बघून टॉन्टिंग करतात ,   नोकोत्या शब्द बोलून जातात , अश्लील इशारे करून जातात , पोलिस चौकी नसल्या मुळे गावातील लोकांना 25 ते 30 किलोमिटर शिरपूर पोलीस स्टेशन इथे जाऊन तक्रार करावी लागते , शिरपुर जाऊन तक्रार देने शक्य होत नाहीं पोलिसांना इथे येण्या साठी 45 मिनिटे निघून जात , व त्या 45 मिनिटात काही ही घडण्याची शक्यता असते , हळू हळू बहरून येणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे.

 

प्रशासकांना विनंती करण्यात आली आहे

  • त्या मुळे कॉलनीत क्राईम वाडण्याची ही शक्यता खूप वाढली आहे ,या आधीही कॉलनीत चोऱ्या , मारामारी , दारू पेण्या साठी आलेल्या बाहेरच्या लोकांचे भांडण या सारख्या गोष्टी घडलेल्या आहेत , प्रशासकांना विनंती करण्यात आली आहे की या गोष्टीं कडे दुर्लक्ष न करता यावर कारवाही करण्यात यावी व आमच्या कैलाश नगर , माथोली, जुगाद या गावांच्या सुरक्षेसाठी व महिलांच्या सुरक्षेसाठी माथोली गावात पोलीस चौकी लावण्यात यावी अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आली.