मूल येथील काँग्रेस भवनावर पोलिसांची धाड; दारू आणि पैसे वाटपाचा आरोप
काँग्रेस भवनातील वादावरून गांधी चौकात तणाव; विजय चिमड्यालवार ताब्यात
सविस्तर बातमी:
मूल (प्रतिनिधी) – मूल शहरातील काँग्रेस भवनात दारू आणि पैसे वाटप होत असल्याची तक्रार भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांकडे प्राप्त झाल्याने बुधवारी पोलिसांनी काँग्रेस भवनावर धाड टाकली. या कारवाईत विजय चिमड्यालवार यांना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चिमड्यालवार महिलांना काँग्रेस भवनात बोलावून दारू व पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गांधी चौकात एकत्र येत विरोध दर्शवला. यामध्ये भाजपा नेत्या सपना मुनगंटीवार आणि शलाका मुनगंटीवार यांनी देखील काँग्रेस भवनात जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
घटनास्थळी पोलीस पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गांधी चौकात मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि गर्दी पांगवली. यावेळी दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली, मात्र पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून मोठा अनुचित प्रकार टाळला.
मुल मध्ये रांडा पहा सविस्तर 👇👇👇
तपासादरम्यान, स्थानबद्ध केलेल्या विजय चिमड्यालवार यांच्याकडून काही पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
याप्रकरणामुळे मूल शहरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, भाजपने काँग्रेसवर निवडणुकीपूर्वी गैरप्रकार करत असल्याचा आरोप केला आहे.
ही घटना मूलमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड महत्त्वाची मानली जात असून या प्रकरणावर नागरिक आणि राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.