स्थानिक गुन्हे शाखेची बल्लारपूर येथे अवैद्य सुगंधीत तंबाखु विक्रेता विरुद्ध कारवाई..
चंद्रपूर/महाराष्ट्र
दि. 14 अक्टोबर 2024
रिपोर्ट : अनुप यादव, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सविस्तर बातमी :– बल्लारपूर, 14 ऑक्टोबर 2024: स्थानिक गुन्हे शाखेने आज बल्लारपूर येथे अवैद्य सुगंधीत तंबाखु विक्रेत्याविरुद्ध कारवाई करत 53,819 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाणे बल्लारपूरच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आंबेडकर वॉर्डातील नीरज शाहू या व्यक्तीच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखुचा साठा आढळला.
छाप्यात मिळालेल्या मालाची एकूण किंमत 53,819 रुपये आहे. आरोपी नीरज शाहू याच्याविरुद्ध पोलीस ठाणे बल्लारपूर येथे अपराध क्रमांक 962/2024 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 223, 275, 123 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.