अवयवदान केलेल्या पोलिसाची मुलगी झाली पोलीस ऑफिसर !

69

अवयवदान केलेल्या पोलिसाची मुलगी झाली पोलीस ऑफिसर !

राष्ट्रीय चर्मकार संघाने घरी जावून केला सत्कार

वडिलांचे स्वप्न केले तिने पूर्ण

चंद्रपुर/महाराष्ट्र 

दि. 01 अक्टूबर 2024

रिपोर्ट : अनुप यादव, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

विसापूर : सामाजिक कार्याची आवड असलेले वडील अरुण भटवलकर पोलीस खात्यात नोकरी बजावून सन्मानाने निवृत्त झाले.आपला एक तरी पाल्य पोलीस खात्यात अधिकारी व्हावा अशी त्यांची इच्छा होती. अचानक एक दिवस घरी असताना भोवळ येवून खाली पडले. गंभीर अवस्थेत त्यांना दवाखान्यात नेण्यात आले; डॉक्टरने त्यांना ब्रेनडेड घोषित केले अशा अवस्थेत कुटुंबियांनी अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. अश्या परोपकारी वडिलांची लहान मुलगी कल्याणी भटवलकर हिने वडिलांचे स्वप्न पूर्ण करत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होवून पोलीस ऑफिसर होण्याचा मान मिळवला व ती चंद्रपूर जिह्यातील चर्मकार समाजातील पहिलीच महिला पोलिस अधिकारी असल्याने राष्ट्रीय चर्मकार महासंघाने तिचा घरी जावून सत्कार केला व तिच्या कार्याचा गौरव केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने झालेल्या एम पी एस सी २०२२ रखडलेला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि ही गोड बातमी ऐकून कल्याणीच्या आई व भावंडांच्या डोळ्यात पाणी आले. वडील जिवंत असताना जर हा निकाल आला असता तर त्यांची इच्छा -आकांक्षा धाकट्या मुलीने पूर्ण केली हे दिसले असते व आनंद द्विगुनीत झाला असता. ही खंत नयना अश्रू तरळत तिने राष्ट्रीय चर्मकार महासंघाने तिचा सत्कार व गौरव केला तेंव्हा व्यक्त केला. कल्याणीने आपले प्राथमिक शिक्षण ज्युबली हायस्कूल चंद्रपूर येथून पूर्ण केले. नंतर तिने नागपूर येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग या मध्ये व्यावसायिक पदवी पूर्ण केली. परंतु वडिलांची इच्छा तिने पोलीस खात्यात नोकरी करावी अशी असल्याने तिने इंजिनीयर होऊन सुद्धा स्पर्धा परीक्षेकडे वळली व २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. आयोगाने निकाल २०२४ ला लावला व आज ती पोलीस ऑफिसर झाली.

कल्याणीच्या या यशामुळे व चंद्रपूर जिल्ह्यातील दलित चर्मकार समाजातील पहिलीच पोलीस ऑफिसर होण्याचा तिने मान मिळवल्यामुळे जिल्ह्यातील चर्मकार समाजाने आनंद व्यक्त केला व तिच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागली. तिच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमा खंडाळे, राज्य उपाध्यक्ष समिक्षा भटवलकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विप्लव लांडगे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष महेश लिपटे व इतर सर्व पदाधिकारी यांनी तिचा घरी जावून सत्कार केला.