कत्तलीसाठि गोवंशीय जनावरे घेवुन जाणारा गजाआड

54

कत्तलीसाठि गोवंशीय जनावरे घेवुन जाणारा गजाआड

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि . १ अगस्त 2024

रिपोर्टर :- रमाकांत यादव जिल्हा प्रतिनिधि ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
 

पूरी खबर:-अवैधरीत्या कत्तलीसाठि जनावरे घेऊन जाणार्या आयशर MH 34 BG- 1989 या क्रमांचा ट्रक ला भद्रावती पोलिसांनी चंद्रपूर नागपुर रोड एन टि पी सी जवळ सापळा रचुन ट्रक का थांबविले असता एक ईसम पोलिसांना पाहुन पळून गेला तर तर ड्राइवर अब्दुल राजीक अब्दुल रफिक व ट्रक ताब्यात घेवुन पहाणी केली असता त्या मध्ये गोवंशीय जातीचे जनावरे असल्याचे आढळून आले.

यामध्ये जनावरांची किंमत 1लाख 4000 रुपये तर ट्रक ची किंमत 5,00000 लाख रूपये असा एकूण 6,लाख 4000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गोवंशांना गोशाळेत दाखल केले.
ताब्यात घेतलेल्या अब्दुल राजीक अब्दुल रफिक (वय40) धंदा चालक रा. पठानपुरा मूर्तीजापूर जिल्हा अकोला 2) फरार आरोपी नाव गोलु कुरेशी रा. लोहि तालुका नेर जिल्हा यवतमाळ 3) चांद रा. आस्ताना मोहल्ला कारंजा ता.कारंजा जिल्हा वाशीम यांचे विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारणा-2015 -कलम 5 (अ)(1), 5(ब) 9,11 सहकलम 11(1)ड भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागवने प्रतिबंध अधिनियम 1960 प्रमाणे आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक चंद्रपूर मुमक्का सुदर्शन, साहाय्यक अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचा मार्गदर्शनात पोलिस स्टेशन भद्रावती पोलिस निरीक्षक बिपीन ईंगडे, पोलिस उप निरिक्षक किशोर मुळे ,स.फौ. गजानन तुपकर, पो.हवा. अनुप आष्टणकर, पो.अं. योगेश घाटोडे, विक्कि परतेकि, विजय तलांडे यांनी केली.