कृषी केंद्र दुकानदारांकडून कृषी अधिकारी यांची अवैध वसुली.

65

कृषी केंद्र दुकानदारांकडून कृषी अधिकारी यांची अवैध वसुली.

भद्रावती व चंद्रपूर येथे कृषी अधिकारी असलेल्या त्या वसुलीबाजाची बेहिशोबी मालमत्ता येणार समोर..

भद्रावती :- 

सविस्तर बातमी:- वरोरा येथून भद्रावती येथे आलेले व चंद्रपूर चा सुद्धा पदभार असलेल्या एका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्राच्या बियाणे औषधी व खतांच्या साठ्याबद्दल वरिष्ठाना अहवाल अहवाल सादर करण्यासाठी ते कृषी केंद्र नियमित व ठरलेल्या काळात सुरू आहे हे दाखविण्याचे पाच ते 20 हजार रुपये घेतं असल्याची माहिती असून याबाबत एक संभाषण हाती लागले आहे, दरम्यान तो अधिकारी कोण हे लवकरच समोर येईल पण काहीही कारण नसताना व नियमानुसार कृषी केंद्र सुरू असताना कृषी अधिकारी यांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी कृषी केंद्राच्या चालकांना त्रास देणे म्हणजे ते जणू खंडणी मागत असल्याचे दिसत आहे, त्यामुळं त्या कृषी अधिकाऱ्यांvr योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

 

ऐका कृषी अधिकारी हे पैसे घेत असल्याची ऑडिओ👇👇👇

 

खरं तर कृषी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी शेतकऱ्यांनी जी बियाणे, रासायनिक खते व औषधी विकत घेतली त्याची गुणवत्ता तपासने व जर ते बी बियाणे व खते ही डुबलीकेट किंव्हा बोगस असतील तर त्या कृषी केंद्र चालविणाऱ्यावर कार्यवाही करावी तपासली जावी यासाठी कृषी अधिकारी जबाबदार असतात, पण ते स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधन्याच्या प्रयत्नात असतात हे आता स्पष्ट झालं असून भद्रावती व चंद्रपूर अशा दोन तालुक्याचा पदभार असलेल्या त्या कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्राच्या संचालकांना पैसे मागितल्याची ऑडिओ असूनत्या कृषी अधिकाऱ्यांची चल अचल सपंतीची चौकशी कारण्यात यावी अशी मागणी आता जोर धारणार आहे. दरम्यान आता अनेक कृषी केंद्र दुकानदारांच्या तक्रारी येत असल्याने वरिष्ठ प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.