कर्जमाफी व पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित मदत करा.

41

कर्जमाफी व पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित मदत करा.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांना भेटून मागणी करणार, वंचित शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार.

 

 

चंद्रपूर/महाराष्ट्र 

दि.11 जुलाई 2024

रिपोर्ट : अनुप यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

सविस्तर: 

चंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व स्थानिक तलाठी तहसीलदार आणि वित्तीय संस्था यांच्या तांत्रिक चुकामुळे कर्जमाफी मिळाली नाही, शिवाय अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या व उभे पीक वाया गेले असतांना बाधित सर्व शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल होऊन तो आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष आंनद बावणे, जिल्हा उपाध्यक्ष मोहित हिवरकर, भदूजी गिरसावळे यांच्या नेतृत्वात आता शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी आणि पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी थेट उद्या शुक्रवारला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे, दरम्यान ज्या तांत्रिक चुकामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बैंकां, सहकारी बैंक व्यवस्थापक व सहकारी संस्था निबंधक यांची बैठक बोलवावी व तालुका स्थरावर तहसीलदार यांनी सुद्धा राष्ट्रीयकृत बैंक व्यवस्थापक व निबंधकांची बैठक बोलावून कर्जमाफी संदर्भात तांत्रिक चुका होऊ न देता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात येणार आहे, शिवाय जिल्ह्यात पीक विम्यापासून हजारो शेतकरी वंचित असल्याने त्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे यासाठी पण शेतकऱ्यांना घेऊन मनसेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे धडकणार आहे.

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात वरोरा भद्रावती तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी कर्जमाफी योजनेच्या वंचित शेतकऱ्यांनी शासनाकडे मागील चार वर्षांपासून पाठपुरावा केला व बैलबंडी मोर्चा, रस्ता रोको यासारखी आंदोलन करून शासनासाचे लक्ष वेधले होते, एवढेच नव्हे तर वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना भेटून कर्जमाफी करिता आपण पुढाकार घ्यावा अशी विंनती केली होती, अशातच आता महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची अमलबजावणी करण्याची घोषणा केल्याने या कर्जमाफी पासून वंचित जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. दरम्यान पुन्हा तांत्रिक अडचणी व चुका होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्थरावर राष्ट्रीयकृत बैंक, सहकारी बैंक व्यवस्थापक आणि जिल्हा निबंधक यांची बैठक घेऊन तालुका स्थरावर आढावा घेण्यासाठी तहसीलदार यांच्या पुढाकाराने बैठक घेऊन तांत्रिक बाबी सोडवाव्या आणि हवालदील शेतकऱ्यांना न्याय द्यावा शिवाय ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले मात्र त्यांना 50 हजार प्रोत्साहन मदत मिळाली नाही पीक विम्याचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यांना मिळवून देण्यासाठी विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना तंबी द्यावी इत्यादी मागण्या घेऊन उद्या शुक्रवारला मनसेचे पदाधिकारी व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक 12 जुलैला उपस्थित राहावे असे आव्हान शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांनी केले आहे.