वर्धा नदीच्या सोईट रेती घाटावर रेती तस्करी जोरात.

74

वर्धा नदीच्या सोईट रेती घाटावर रेती तस्करी जोरात.

तहसीलदार योगेश कौटकर यांचा आशीर्वाद, माढेळी येथील जवळपास 12 ट्रॅक्टर ने रेती वाहतूक.

 

वरोरा प्रतिनिधी :-

सविस्तर बातमी :- तालुक्यातील माढेळी गावातील अनेक ट्रॅक्टर धारक हें सोईट च्या वर्धा नदी घाटावर खुलेआम रेती काढून त्याची वाहतूक करीत असतांना याकडे तहसीलदार योगेश कौटकर यांचे महसूल प्रशासन नेमके काय करत आहे हें कुणालाही कळत नसून पोलीस प्रशासन पण गप्प असल्याने जवळपास 12 ते 15 ट्रॅक्टर रेतीवर सुरु आहे आणि लाखों रुपयाचा महसूल बुडविल्या जात आहे. रात्रीच्या अंधारात तर रेती वाहतूक होत आहेच पण दिवसाढवळ्या सुद्धा रेती वाहतूक होतांना दिसत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गांभीर्याने दखल घेऊन तहसीलदार योगेश कौटकर यांच्यावर कार्यवाही करून अवैध रेतीवर अंकुश लावावा व शासनाचा महसूल वाचावावा अशी मागणी होत आहे.

नीलजई रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून काही राजकीय मंडळीचे ट्रॅक्टर सुद्धा सामील आहे, अशातच एका राजकीय पदाधिकारी याचा ट्रॅक्टर पकडल्याची माहिती आहे.

 

तालुक्यात असलेल्या अनेक रेती घाटातून रेती उत्खनन व वाहतूक होतं असतांना त्यावर प्रतिबंध लावण्याचे काम तहसीलदार योगेश कौटकर यांचे असतांना ते काम पोलीस विभागाला करावे लागतं असल्याचे समोर येत असून तहसीलदार योगेश कौटकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, अवैध रेती वाहतूक असो की अवैध गौण खनिज उत्खनन असो त्यांना खुली सूट व सर्वासामान्य नागरिकांची अनेक कामे ही पैसे घेतल्याशिवाय करायची नाही व गैरअर्जदार यांच्याकडून चिरीमिरी घेऊन चुकीचे निर्णय द्यायचे व शेतकऱ्यांवर अन्याय करायचा एवढे काम तहसीलदार योगेश कौटकर करत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही व्हावी अशी मागणी नेहमीच होत असतें पण अजूनपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही, आता तर ते जिथून पैसे मिळतील तिथून पैसे मिळावीण्यासाठी अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी वेळीच दखल घेऊन तहसीलदार योगेश कौटकर यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.