५ टन (५,००० किलो) गोवंशाचे कापलेले मास जप्त
पोलीस स्टेशन रामनगर यांनी संयुक्त कारवाही करत दोन आरोपी केले जेलबंद.
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि .16 मार्च 2024
रिपोर्टर :- रमाकांत यादव जिल्हा प्रतिनिधि ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सविस्तर बातमी:-उप विभागिय पोलीस अधिकारी सा. चंद्रपुर व पोलीस स्टेशन रामनगर यांनी संयुक्त कारवाही करत अवैधरित्या ५ टन (५,००० किलो) गोवंशाचे कापलेले मास व टाटा कंपनीचे १११२ आयसर जप्त करुन दोन आरोपी केले जेलबंद.
अवैधरित्या होण्याऱ्या गोतस्करीवर कारवाही करन्याचे मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर यांनी निर्देश दील्याने उप विभागिय पोलीस अधिकारी सा. चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन रामनगर अधिकारी/कर्मचारी त्यांना योग्य त्या सुचना देवुन कार्यवाही करत.
उप विभागिय पोलीस अधिकारी सा. चंद्रपुर यांना गुप्त बातमिदारा कडुन मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरुन वरोरा नाका चंद्रपुर या ठिकानी नाकाबंदी करुन संशयीत वाहन थांबवन्याचा इशारा केला असता तो पोलीसांना पाहुन गाडी न थांबवता पळु लागला व धोकादायक रित्या गाडी चालवत असता त्यास रोड ब्लॉक करुन थांबवुन सदर वाहनाची पाहनी केली असता वाहनामध्ये. वाहनामध्ये प्लॉस्टीक व ताळपत्री चे खाली जनावरांचे/गोवंशाचे कापलेले मास व शरीराचे तुकडे बर्फात ठेवलेले दिसले. यावरून टाटा कंपनीचे १११२ आयसर क. MH 40 CT 2069 वाहनातील कापलेले मास व शरीराचे तुकडे हे जनावरांचे /गोवंशाची कत्तल करुन वाहतुक करत असल्याची प्रथमदशर्नी खात्री झाल्याने वाहनातील प्लॉस्टीक व ताळपत्री चे खाली जनावरांचे/गोवंशाचे कापलेले मास व शरीराचे तुकडे अंदाजे वजन ५ टन (५,००० किलो) पंचनाम्या प्रमाने अंदाजे किंमत १०,००,०००/रू व टाटा कंपनीचे १११२ आयसर किंमती अंदाजे १५,००,०००/ असा एकुण २५,००,०००/रू चा माल चा माल पंचनाम्याप्रमाने जप्त करुन चालक नामे मोहम्मद राफे कुरेशी, वय १९ वर्ष, रा. भाजीमंडी कामठी ता. कामठी जि.नागपुर व सोबती नामे इशाद बबलु टांडी वय २० वर्ष, रा. यशोधरा नगर कामठी ता. कामठी जि. नागपुर यांचे विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे अप.क. २८७/२०२४ कलम ४२९ भादवि, सहकलम ५ (क), ६,९,११ महा.प्रा. संरक्षण कायदा, सहकलम ८३,१३०/१७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली मा.उप विभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव सा. चंद्रपूर पोलीस निरीक्षक सुनील गाडे सा. पो.उप.नि. अतुल कावळे, पो ना / २४३० लालु यादव पोशि/ट विकास, चालक पो हवा / ब.नं. १३१५, पोशि/ट मिलींद, पोशि/१४०० वावळे यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे