संगीता सेल्स पुन्हा मिलावट कोळसा पुरवठा करण्याच्या तयारीत !
जिंदल पॉवर प्लाँट ला होणार मिलावट कोळश्याचा पुरवठा !!
चंद्रपूर (वि. प्रति . )
चंद्रपुर/यवतमाल/वणी
सविस्तर बातमी :- मध्यप्रदेशातील जिंदल पॉवर ला मिलावट कोळश्याचा पुरवठा करण्याच्या तयारीला पुन्हा एकदा संगीता सेल्स लागली आहे. यापुर्वी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर संगीता सेल्स आता अलर्ट मोड मध्ये असुन अत्यंत सावधगिरीने आता कामाला लागली असल्याचे कळते.
और खबर पढ़ें 👇👇👇
महत्वाची बाब म्हणजे यापुर्वी आमच्या वृत्ताद्वारे आम्ही यापुर्वी संगीता सेल्स या ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा लंद- फंदा कारभार ‘मामा’ नावाचे व्यक्ती मोठ्या शिताफीने सांभाळत असतात. याची माहिती दिली होती. आता हाच ‘मामा’ अलर्ट मोडवर आला असुन संगीता सेल्स च्या चंद्रपूरातील ताडाळी येथील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील संगीता सेल्स च्या कोल डेपोवर मिलावट करण्यासाठी आणलेली चुरी, कोळश्याचा निकृष्ट दर्जा एका ठिकाणी संग्रहीत करून ठेवत असुन जिंदल पॉवर १५ हजार टन मिलावट करून जिंदल पॉवर ला पुरवठा केल्यानंतर उर्वरित २५ हजार टन कोळसा सावधगिरीने मिलावट करून पुरवठा करण्याच्या तयारीत आहे. या बाबीची माहिती ई-मेल व अन्य साधनांद्वारे जिंदल पॉवर चे मॅनेजिंग डायरेक्टर व व्हिजीलेंस एजेंसी पर्यंत पोहोचविण्याच्या शुभ कार्य मिडीया शिष्टमंडळानी केले असुन जिंदल पॉवर ची व्हिजीलेंस टिम आता सावध झाली असल्याचे सांगण्यात येते. विशेष बाब म्हणजे यापुर्वीच्या १५ हजार टन मिलावट कोळश्याचा संगीता सेल्स ने जिंदल पॉवर ला केलेल्या पुरवठ्यानंतर उच्च दर्जाचा कोळशा खुल्या बाजारात विकुन मोठी माया संगीता सेल्स ने आता जमविली आहे. संगीता सेल्स चा ‘मामा’ ही आता पुर्वी पेक्षा आणखी जास्त वेगाने व सतर्क होवून कामाला लागला आहे. मिडीया ची टिम संगीता सेल्स वर पुर्ण नजर ठेवून असुन कुठे कोणता चुरा जमा आहे, याची माहिती जिंदल सेल्स चे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे सत्कार्य करणार आहे. संगीता सेल्स च्या काळ्या बाजारवरून लवकरचं पडदा उठणार असल्याचे चित्र आहे.