SDM ने केली रेती तस्कराची पोकलेन मशीन जप्त.

184

SDM ने केली रेती तस्कराची पोकलेन मशीन जप्त.

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि . 19 डिसेंबर 2023
रिपोर्टर :- रमाकांत यादव जिल्हा प्रतिनिधि ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सविस्तर बातमी :- चंद्रपूर जिल्ह्यात रेती घाटांवर अवैध उत्खनन सुरू असून, खुलेआम वाळू तस्करी सुरू आहे. अशा स्थितीत गोंडपिपरी एसडीएमने कारवाई केल्याची बाब समोर आली आहे. गोंडपिपरी तहसीलच्या विठ्ठलवाडा घाटात पोकलँड मशीनद्वारे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती गोंडपिपरी तहसीलच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे 18 डिसेंबर 2023 रोजी एसडीएम, त्यांची टीम आणि गोंडपिपरी पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता रेती घाटाजवळ पोकलँड मशीन आढळून आले. त्यामुळे सायंकाळी पाचच्या दरम्यान एसडीएमने मशीन जप्त केली. हे मशीन राजुरा येथील अमजद खान यांचे असल्याची माहिती आहे.