⛔ गुरूमाऊली सेवा केंद्राचे साकोली शहरात वृक्षारोपण
📕 “झाडे लावा झाडे जगवा” शहरात राबविला अभिनव उपक्रम •
📡 साकोली / महाराष्ट्र SUN. 30. 07. 2023 ◾ आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
🔳 सविस्तर बातमी | साकोली : श्रद्धेय परम वंदनीय जगदगुरू माउलींच्या कृपा आशीर्वादाने व परम पूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने साकोली तालुक्यातील सर्व सेवा केंद्र, आरतीकेंद्र यांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रवि. ( ३० जुलै ) ला सामुहिक वृक्षारोपण करण्यात आले.
🔳 सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम साकोलीतील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथ. शाळा क्र.०१ गणेश वार्ड, पोलीस ठाणे, लक्ष्मीनारायण हायस्कूल सेंदूरवाफा, जगत मल्टिस्पेशॉलिटी रूग्णालय या ठिकाणी घेण्यात आला. याप्रसंगी साकोली तालुका सेवा केंद्रातील ता. अध्यक्ष के.डी. लांजेवार, जिल्हा धर्म क्षेत्रप्रमुख मनिष झिंगरे, नितेश वंजारी, प्रफुल वालोदे, प्रकाश कोवे, शिक्षक टि.आय. पटले, रेखा परतेकी, गिता कापगते, मिना लांजेवार, रेशमा कोवे, वंदना कांबळे, सुधीर हेमणे, डि.एम. मानकर, अंजली गहाणे, शुभम वंजारी, पूनम लांजेवार, विमल रहांगडाले, रोहित निंबेकर, विठ्ठल राऊत, प्रसाद राऊत, रामेश्वर कोल्हे, गंगाधर राऊत, आर्यन कोवे, बाल्या भानारकर यांसह भक्त, साधक, शिष्य, युवा, युवती आणि साकोली तालुका सेवा समितीचे सर्व गुरूबंधू, गुरूभगिणी उपस्थित होते.