• शिवणीबांध जलाशयात जलतरण प्रशिक्षणाचा समारोप

108

📕शिवणीबांध जलाशयात जलतरण प्रशिक्षणाचा समारोप

◾जलतरण संघटनेतर्फे दिल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू उपहार

📡साकोली / महाराष्ट्र
29. 05. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे | उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी • साकोली : प्रत्येक युवा व लहान मुलामुलींना पोहण्यातून व्यायाम आसनाकृत कसरतीत आरोग्य उत्तम राहील व सर्वांना जलतरणाची हौस लागावी म्हणून साकोली जवळील निसर्गाच्या सानिध्यात असणा-या शिवणीबांध जलाशयात सर्वांसाठी भव्य जलतरण प्रशिक्षणाचा शुभारंभ १४ मे पासून करण्यात आला होता. सदर जलतरण प्रशिक्षणात दिडशेंच्या वर मुलामुलींनी व बालकांनी यात नोंदणी करून भाग घेतला आणि दोन आठवडे चाललेल्या या प्रशिक्षणाचा ( ता. २८ मे.) ला समारोप करण्यात येऊन विद्यार्थ्यांना भेटवस्तू उपहार देण्यात आले.
साकोली तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन दृष्य व अथांग महासागर म्हणून शिवणीबांध जलाशयात दररोज प्रभातकाळी शेकडो जलतरणपटू पोहायला येतात. येथील शिवणीबांध जलतरण संघटना साकोली व स्विमींग ॲण्ड स्पोर्टस ॲडव्हेंचर ॲकडमी शिवणीबांधने नाविन्यपूर्ण उपक्रम काढीत १४ – २८ मे असा दोन सप्ताह जलतरण प्रशिक्षण आयोजित केले होते. यात सर्वांना जलतरणाचे प्रशिक्षण दिले. यात संघटनेचे उत्कृष्ट जलतरणपटूंनी प्रशिक्षण देत मुलांना पोहण्यात तरबेज केले. २८ मे रोजी याचा समारोप प्रसंगी अध्यक्ष सदाशिव वलथरे उपाध्यक्ष भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, माजी जिपस रमेश चू-हे, माजी जिपस उमेश सिंगनजूडे हे हजर होते. समारोपीय प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना विविध भेटवस्तू उपहार म्हणून देण्यात आल्या. सदर दोन आठवडे चाललेल्या या जलतरण प्रशिक्षणात जलतरण प्रशिक्षक डॉ. चंद्रकांत निंबार्ते, ॲड. मनिष कापगते, राजेश ढोमणे, धनंजय हेडाऊ, परसराम फेंडरकर, जनार्दन दोनोडे, कैलाश लूटे, मारोती भुरे, मोरेश्वर डोये, शैलेश ढोमणे, गणेश खोटेले, राजेश कापगते, महिला जलतरणपटू देवश्री कापगते, पिंगळे मैडम, मेश्राम मैडम यांनी मुलामुलींना पोहण्याचे प्रशिक्षण दिले. तर शिवणीबांध जलतरण संघटना साकोली व स्विमींग ॲण्ड स्पोर्टस ॲडव्हेंचर ॲकडमी शिवणीबांध यांनी सुरक्षा व्यवस्था सांभाळली. समारोपीय कार्यक्रमात प्रस्ताविक डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी केले तर संचालन ॲड. मनिष कापगते यांनी केले. आणि आभार प्रदर्शन येरवडे गुरूजी यांनी केले.

• ( Warring –  🚫 Do not Copy this Global Maharashtra News Media )