⭕ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जंगलात केले दाखल
साकोली / महाराष्ट्र 21. 05. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी :
साकोली : नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सहक्षेत्रात वीस वाघांची क्षमता आहे परंतु सद्यस्थितीत येथे केवळ ११ वाघ आहेत त्यात नऊ नर व दोन मादी वाघ आहेत त्यामुळे आज नागझिरा येथे दोन वाघिणींना सोडण्यात आलेले आहे पर्यटकांना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांचे दर्शन सहजासहजी होत नाही त्यामुळे जंगलातील वाघांची संख्या वाढवून जंगलाचे संतुलन राखण्यासोबत पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने नागझिरा येथे आज दोन वाघिणींना सोडण्यात आलेले आहे .जगात सर्वात जास्त वाघांची संख्या भारतात आहे. व भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त वाघांची संख्या विदर्भात आहे त्यामुळे वाघांचे कॅपिटल म्हणून विदर्भाची ओळख निर्माण झालेली आहे त्यामुळे आज नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणींना सोडल्याने आता पर्यटकांना व्याघ्रदर्शनाची मेजवानी मिळणार आहे ,असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शनिवार दिनांक २० मे ला नागझिरा येथील घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेले आहे, यावेळी खासदार सुनील भाऊ मेंढे तसेच माजी आमदार बाळा काशीवार ,खासदार अशोक नेते, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार विजय रहांगडाले, जि प सदस्य माहेश्वरी नेवारे, मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य चे महीप गुप्ता ,मुख्य वनरक्षक रंगनाथ नाईकडे, पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर उपवन संरक्षक राहुल गवई, भंडारा उपवनसंरक्षक गोंदिया पुलराज सिंग क्षेत्र संचालक जय रामे गुंडा आर उपसंचालक नागझिरा अभयारण्य पवन जेफ यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातून वाघ सोडावेत अशी अनेक दिवसांपासून खासदार सुनील मेंढे हे मागणी करत होते त्यासाठी दहा महिन्यापासून या दोन वाघिणींना सोडण्याच्या कामावर वनविभाग लक्ष ठेवून होता नागझिरा अभयारण्यात नैसर्गिक अधिवास जास्त व वाघांची संख्या कमी असल्याने नागझिरा अभयारण्यात आज दोन वाघिणींना सोडण्यात आलेली आहे भविष्यात आणखीन तीन वाघिणींना सोडण्याचाही विचार केला जाईल २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते आज २०२३ ला वाघांची संख्या ५०० झालेली आहे यासोबतच दुर्मिळ होत जाणाऱ्या जातीमधील माळढोक गिधाड सारस या पक्षांची संख्याही वाढवण्यासाठी वन विभाग काम करीत आहे वाघांची संख्या जास्त जंगलामध्ये वा संख्या जास्त आहे तेथे तरुण वाघ वयस्कर वाघ यांच्यात संघर्ष होतो व वयस्कर वाघ यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने हे वाघ गावाकडे वळतात व वाघ व मानव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो त्यामुळे ज्या जंगलात वाघांची संख्या अधिक आहे अशा वाघांचे स्थलांतर कमी संख्या असणाऱ्या कमी वाघांची संख्या असणाऱ्या जंगलामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून वन विभाग काम करीत आहे.