🛑 शिवणीबांध जलाशयात भव्य जलतरण प्रशिक्षण शिबिर १४ मे पासून
🔳 शिवणीबांध जलतरण संघटना साकोली व स्विमींग ॲण्ड स्पोर्टस ॲडव्हेंचर ॲकडमी शिवणीबांधचा नाविण्यपूर्ण उपक्रम
साकोली / महाराष्ट्र
10. 05. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी : साकोली : आज प्रत्येक युवा मुलामुलींना पोहण्यातून व्यायाम आसनाकृत कसरतीत आरोग्य उत्तम राहील व सर्वांना जलतरणाची हौस लागावी म्हणून साकोली जवळील निसर्गाच्या सानिध्यात असणा-या शिवणीबांध जलाशयात सर्वांसाठी भव्य जलतरण प्रशिक्षणाचे आयोजन रवि. १४ मे ते रवि. २८ मे २०२३ पर्यंत करण्यात आले आहे. सदर जलतरण प्रशिक्षणात जास्तीत जास्त जलतरणप्रेमींनी भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
साकोली तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन दृष्य व अथांग महासागर म्हणून शिवणीबांध जलाशयाचे नाव पुढे येते. येथे दररोज प्रभातकाळी शेकडो जलतरणपटू पोहायला येतात. येथील शिवणीबांध जलतरण संघटना साकोली व स्विमींग ॲण्ड स्पोर्टस ॲडव्हेंचर ॲकडमी शिवणीबांधने नाविन्यपूर्ण उपक्रम काढला असून यात सर्वांना जलतरणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिर रविवार १४ मे ते रविवारी २८ मे २०२३ असे दोन आठवडे चालणार असून जलतरण प्रशिक्षणाची वेळ दररोज सकाळी ०६:३० ते सकाळी ०७:३० अशी एक तासांची राहील यात संघटनेचे उत्कृष्ट जलतरणपटू प्रशिक्षण देतील. सदर जलतरण प्रशिक्षणात जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा आणि जलतरण प्रशिक्षक चंद्रकांत निंबार्तै – 9011603999, ॲड. मनिष कापगते – 9423178208, राजेश ढोमणे – 9423112588, धनंजय हेडाऊ – 8208817289, परसराम फेंडरकर – 9423413642, जनार्दन दोनोडे – 9420937571, कैलाश लूटे – 9588447526, मारोती भुरे – 9764718355 या सर्व दूरध्वनींवर प्रशिक्षण नोंदणी करीता संपर्क साधावा असे शिवणीबांध जलतरण संघटना साकोली व स्विमींग ॲण्ड स्पोर्टस ॲडव्हेंचर ॲकडमी शिवणीबांध यांनी केले आहे.
[ Warning • Do not 🚫 Copy this Global Maharashtra News a Copyright Act • ]