💢 महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी महिलांची सहकारी बँक आवश्यक – ॲड. मनिष कापगते
🔳 साकोलीत आई महिला नागरी सह.पत संस्थेचा शुभारंभ थाटात
▪️साकोली / महाराष्ट्र
▪️07. 05. 2023
▪️ रिपोर्ट – आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया
📕 सविस्तर बातमी :- साकोली : ग्रामीण व शहरी महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी महिलांची सहकारी बँकेची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा सचिव ॲड. मनिष कापगते यांनी ( ता. ०७.मे ) साकोलीत आई महिला नागरी सह. पण संस्थेच्या उदघाटन प्रसंगी केले. सदर पत संस्थेचा शुभारंभ सोहळा नर्सरी कॉलनी मेन रोड येथे थाटात संपन्न झाला.
आई महिला नागरी सह. पत संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी उदघाटक जिल्हा भाजपा सचिव ॲड. मनिष कापगते, संस्थेच्या अध्यक्षा नुतन फटींग, भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेचे संजय सुतार, गोदावरी फटींग, सुहवानी गि-हेपुंजे, देवेश नवखरे, आनंद सोनवाने, राजेश ढोमणे, व्यवस्थापक सोहम फटींग, शाखा व्यवस्थापक जयंत गि-हेपुंजे हे हजर होते. शुभारंभ पश्चात ॲड. मनिष कापगते यांनी भाषणात सांगितले की “विना सहकार नाही उद्धार” या ब्रिदवाक्याप्रमाणे आज ग्रामीण भागासह शहरी क्षेत्रातील महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी महिलांची सहकारी संस्थांची स्थापना आवश्यकता असल्याचे सांगितले यातून महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पालनपोषणासाठी संस्थांतून आर्थिक पाठबळ मिळणार असे सांगितले. तर पतसंस्थेच्या अध्यक्षा नुतन फटींग यांनी सांगितले की आज ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाची दिशा दाखविणारे पाऊल आम्ही उचलले असून त्यांना गृह उद्योग, कुटीर उद्योग यासारखे विविध व्यवसायिक भांडवली करीता आपली महिला पतसंस्था जास्तीत जास्त महिलांचे बचतगट स्थापन करून त्यांना स्वइच्छेनुसार आपल्या उद्योगासाठी सुलभ व अल्प व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल जेणेकरून आता महिलाही रोजगार व व्यापारी क्षेत्रात आपली बाजारपेठेत पकड मजबूत करेल असे भाषणात सांगितले. यावेळी शुभारंभाला साकोली शहरासह ग्रामीण भागातील महिला पुरुष हजर होते. या उदघाटन सोहळ्यात संचालन देवेश नवखरे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य व्यवस्थापक सोहम फटींग यांनी केले.