अन्यथा नगरपरिषदेवर काढू घागर गुंडी मोर्चा ; वैशाली झनक लांजेवार यांचा इशारा
साकोलीत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती ; समस्या तातडीने सोडवा
साकोली / महाराष्ट्र
दि. 26. 04. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी : साकोली :- स्थानिक श्रीनगर कॉलनी प्रभाग ०१ मधील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे वरून हातपंपाच्या पाण्याची पातळी कमी होऊन महिलांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे. रखरखत्या उन्हात पाणी समस्या लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने तातडीने पाण्याचे टँकर लावित ही भीषण समस्या सोडवावी अन्यथा महिलांसह नगरपरिषद कार्यालयावर घागर गुंडी मोर्चा काढला जाईल असे महिला सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झनकलाल लांजेवार यांनी याबाबत निवेदन २६ एप्रिल २०२३ ला मुख्याधिकारी साकोली यांना देत संतप्त इशारा दिला आहे.
शहरातील श्रीनगर कॉलनी प्रभाग १ मध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई निर्माण झाली आहे. येथील काही दुरवरील असलेल्या हातपंपांची पाण्याची पातळी कमी होऊन दररोजच्या वापरातील पिण्याचे पाणी व इतर घरकार्यात लागणारे पाणी आता महिलांना दिसेनासे झाले. आजची परिस्थिती ही आली की महिला पाण्यासाठी इतरत्र दारोदार भटकत असतानांचे चित्र पहावयास मिळत आहे. हा आलेला मे भीषण उन्हाळा लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने अतितातडीने प्रभागांसह साकोली सेंदूरवाफा शहरात टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. जर हि समस्या तात्काळ दूर न झाल्यास प्रभागातील सर्व महिलांसह नगरपरिषद साकोली कार्यालयावर घागर गुंडी मोर्चा काढला जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा महिला सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झनकलाल लांजेवार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.