मृत व्यक्तींचे नाव संगमरवर टाईल्सवर कोरू, देणगी द्या.! पण ६ वर्ष लोटले टाईल्सचा पत्ता नाही ; अन्यथा पैशे परत करा
श्री संत लहरीबाबा मठात विश्वस्तांकडून मृतकांचे नावे घेतली देणगी • स्मरणार्थ संगमरवर टाईल्सवर नावांचा पत्ता नाही
साकोली / महाराष्ट्र
20. 04. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी • साकोली : शहरातील श्री संत लहरीबाबा मठ देवस्थानाच्या पावत्यांच्या घोळांमधील प्रकरणांवर चौकशी करण्याची मागणी येथील देणगीदारांनी केली असतानाच आता तर मृतकांच्या नावे त्यांच्या स्मरणार्थ संगमरवर टाईल्सवर नाव कोरू असे बोलून देणगीदारांकडून पैशे घेण्यात आले. परंतु या गोष्टीला चक्क ६ वर्ष लोटूनही त्या टाईल्सचा मंदीरात पत्ता नाही. देणगीदारांनी आता मागणी केली आहे की नसेल जमेत तर कशाला आईवडिलांच्या नावावर फसवणूक करीत आत्मा दुखवितात तर घेतलेले संपूर्ण पैशे परत करा अशी भुक्तभोगी देणगीदारांनी मागणी केली आहे.
Read more news 👇👇👇
श्री संत लहरीबाबा देवस्थान पावत्यांच्या गहाळप्रकरणी झाला भक्तांचा आता सोशल मिडीयातून संताप सुरू
सविस्तर की, सन २०१६ ला श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्ट साकोली येथे तत्कालीन अध्यक्ष अशोक गुप्ता असतांनाच रिंकेश उमेश गुप्ता यांकडून दि. १८/०२/२०१६ ला तुमच्या बाबांचे मृत्यू झाला असून त्यांच्या नावाने देणगी द्या, त्यांचे नाव संगमरवर टाईल्सवर मंदीरात लिहू म्हणून ११ हजार १११ रूपयांची अध्यक्ष यांच्या स्वाक्षरींनी पावती फाडली. दूसरे हेमंत बल्लाळ रा. नर्सरी कॉलनी साकोली यांकडूनही ११ हजार त्यांच्या स्वर्गीय आईंच्या स्मरणार्थ १ फूट × १ फूट मार्बलवर मंदीराच्या भिंतींवर नाव कोरू करीता यांकडूनही ११ हजार घेण्यात आले. असे कितीतरी देणगीदारांकडून त्यांच्या आईवडिलांचे स्मरणार्थ निधी घेण्यात आला. मात्र यांना धक्कादायक प्रकार तेव्हा कळला की ६ वर्षांपासून मंदीरात कोणतीच संगमरवर टाईल्सवर नावांचा उल्लेखच नाही. देणगीदांनी आता अशी मागणी केली आहे की जर जमत नव्हते तर देणगी घेतली कशाला.? आम्ही ज्या आईवडिलांच्या पुण्यकारक कार्याला पैशे दिले ते कार्यच झाले नाहीत तर आमचे पैशे परत करा अशी साफ शब्दात प्रतिनिधीकडे तक्रार प्रतिक्रिया दिली आहे. माहिती पडली की याच प्रकारे स्व. रवि गोखले, नंदू गहाणे, रवि अग्रवाल यांनीही याच पद्धतीने देणगी दिली होती पण असाच धक्कादायक प्रकार पहावयास मिळत आहे. भक्तांनी याआधीही अशीच शंका उपस्थित केली होती व आता तर एक एक असा मृतकांच्या नावे देणगी मागून त्यांनाच अंधारात ठेवण्याचा संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. याचीही चौकशी करण्याची मागणी देणगीदार जनतेनी करून याबाद संताप व्यक्त केला आहे.
प्रतिक्रिया • १)
” मी ४ – ५ वर्षांपूर्वी श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान येथे ११ हजार दिले, त्यांनी मला सांगितले की १ बाय १ फूट मार्बलवर तुम्ही जे ही नावं सांगाल ते नाव कोरून मंदीराच्या भिंतींवर ती टाईल्स लावण्यात येईल. त्यांनी मला पावतीही दिली, व मी माझ्या आईचे नाव एका चिठ्ठीवर लिहून दिले. पण काहीच झाले नाही, आम्ही ज्या कामासाठी पैसे दिले होते ते काम तर झालेच नाही, व काम पूर्ण झाले नाही तर आम्ही दिलेले पैसे परत करावेत “
— हेमंत बल्लाळ – देणगीदार – नर्सरी कॉलनी साकोली
प्रतिक्रिया • २)
” इन्होने मुझे मठ में बताऐ की ” आपके पिताजी की डेथ हुई है, उनके नाम से देणगी दिजीऐ, उनका नाम हम वहा संगमरमर पर लिखाऐंगे, मैंने उन्हें नाम बताया स्व. उमेश कुंजीलाल गुप्ता और ११ हजार १११ रुपये देणगी भी दिया, लेकीन वहां तो आज तक ईतने सालो गुजर गयें वहा कुछ ऐसा दिखा ही नहीं, नाम का कोई मतलब ही नहीं , नहीं तो नहीं, मगर जिस काम से चंदा इन्होंने मांगा वह तो किसी का भी पूरा करो, अभी सुनने को आया की रसीदों के पैसे गायब हुऐं है, इसलिए अफसोस हो रहा है, मैंने तारीख १८/०२/२०१६ को ११ हजार १११ रूपये भी दिया उसकी रसीद भी है मेरे पास, लेकीन अब विश्वास ही नहीं रहा, की ऐसा फसायां जा रहा है “
— रिंकेश उमेशकुमार गुप्ता “उमेश किराणा स्टोर्स कुंभली” – रा. गणेश वार्ड साकोली
प्रतिक्रिया • ३)
” समोर जे बनणार आहे तिथे त्यांचे नाव लिहिले जाईल, ज्यांनी अशी देणगी दिली ते नाव आम्ही एका बोर्डावर लिहिले होते पण कार्यक्रमात ते बोर्डच कुणी वर टाकले, कुणी चोरले कुणी नेले, दिसत नाही व ते काही माहित नाही, समोरचे काम राहिले होते पण काम भलतेच झाले, मंदीराचे दर्शनीय भागात नाव लिहू असे सांगितले होते आम्ही, आता मंदीरात कूठे जागा नाही, मंदीर बाहेर दर्शनीय भागात दगडे लाऊन सहा महिन्यात ते काम करू “
— अशोक गुप्ता – तत्कालीन अध्यक्ष • श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्ट साकोली