साकोलीत २० युवकांनी स्वेच्छा रक्तदान करीत स्व. अर्जून सोनकुसरे यांना वाहिली श्रद्धांजली
जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा चमु रक्तदान शिबिरात हजर
साकोली / महाराष्ट्र
17. 04. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी • साकोली : भटके विमुक्त जाती तथा बेलदार समाजाला एकत्र करून त्यांच्या न्यायासाठी झटतांना अचानक दुःखद निधनाने ईश्वरचरणी गेलेले भटके विमुक्त कल्याणकारी समाजातील कर्मठ नेतृत्व दिवंगत स्व. अर्जून सोनकुसरे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त सोमवार दि. १७ एप्रिल २०२३ ला साकोली पटमैदान बेलदार नगर येथे स. ०९ ते दू. ०१ झालेल्या त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिरात एकुण २० युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करीत स्व. अर्जून सोनकुसरे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त ही श्रद्धांजली वाहिली हे विशेष.
सदर रक्तदान शिबिराला प्रमुख अतिथी साकोली ठाणे पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात, अशोका पथकर नाका व्यवस्थापक संजय राय, विधी व न्याय विभागाचे ॲड. दिलीप कातोरे, रा.स्व. साकोली संघचालक बाळा कापगते, रा.स्व.सं.चे गजेंद्र कोसलकर, युवा प्रचारक सुजीत कुंभलकर, भटके विमुक्त कल्याणकारी संस्था उपाध्यक्ष राजेंद्र दोनाडकर, संयोजक श्रीकांत तिजारे, जिल्हा प्र. शिवा कांबळे, क्रिडा शिक्षक जितेंद्र ठाकूर, शास. तंत्रनिकेतन प्रा. निखाडे, सामाजिक नेतृत्व सपन कापगते, माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज, पी.एम. कोटांगले, शामराव शिवणकर, माजी उपाध्यक्ष धनवंता राऊत, जिपस. माहेश्वरी नेवारे, अतुल डोंगरे, प्रणय मोहतुरे, आशिष गुप्ता, आदी हजर होते. या रक्तदान शिबिराला रक्तसंकलन आणि आरोग्य सेवा डॉ. दिपक चंदवाणी, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा चमु डॉ. प्रविण फड, डॉ. प्रसन्न बोदडे, विनय ढगे, राजू नागदेवे, राहूल गिरी यांनी प्रदान केली. आयोजनात भटके विमुक्त कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था विदर्भ प्रांत भंडारा व चॅलेंजर क्रिकेट क्लब मित्र परिवार व बेलदार समाजातील पदाधिकारी संजय सुतार, बंटी सोनकुसरे, तिलक सोनकुसरे, सिमल बोकडे, घनश्याम बोकडे, रवि शहारे, जे.डी. मेश्राम, ओम गायकवाड, सागर पुस्तोडे, राहुल आवरकर, भटके विमुक्त कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था विदर्भ प्रांत सदस्य व आदी मित्र परिवारांनी रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.