श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष अशोक गुप्ता यांच्या कार्यकाळात लाखोंच्यावर गैरप्रकार चव्हाट्यावर

128

श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष अशोक गुप्ता यांच्या कार्यकाळात लाखोंच्यावर गैरप्रकार चव्हाट्यावर

धर्मदाय आयुक्तांकडे अनेक तक्रारी ; आयुक्तांनी ट्रस्टला मागितले गहाळ पावत्यांचे स्पष्टीकरण ; भक्त जनता अडली सर्व “पावत्यांच्या प्रथम हिशोब जनतेसमोर ठेवा.”

साकोली / महाराष्ट्र
10.04.2023
रिपोर्ट – आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली : शहरातील पुरातन काळापासून अगदी जागृत व साकोलीचे आराध्य दैवत श्री संत लहरीबाबा मठ देवस्थानानात सन २०१० ते २०१४, २०१५, २०१६ व २०१७ या कालावधीत मठ देवस्थानानात पावत्यांच्या घोळांमधील वातावरण तापले असून धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारीही गेल्या. मठातील अध्यक्ष, सचिव व विश्ववस्तांना अधिक्षक – न्याय सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय भंडारा यांनी नुकतेच पत्र देत सर्व गैरव्यवहारात गहाळ करण्यात आलेल्या पावत्यांच्ये स्पष्टीकरण मागितले आहे. या संतापजनक प्रकाराने शहरातील हजारोंच्या संख्येने श्री लहरीबाबांच्या भक्तांनी याविरोधात रोष प्रकट केला असून जागृत असलेले श्री संत लहरीबाबा यांच्या पवित्र देवस्थानच्या काही लबाडखोरांनी हे अपवित्र पाप करणा-यांना शासन तर सोडणार नाही पण आमचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लहरीबाबा यांना कदापि सोडणार नसून यांच्या पापांचा घडा आता भरला असून हे पापी अत्यंत वाईट शिक्षा भोगणारच या भाषेत सर्वत्र शहरात चर्चा व संताप व्यक्त होत आहे.

संत श्री लहरीबाबा मठ देवस्थानानात सध्या अध्यक्ष गंगासागर गुप्ता, सचिव नितीन खेडीकर, सुभाष मिश्रा, विश्वस्त प्रभाकर सपाटे, दिनेश हुकरे, अनंत इलमे, से.नि.अधिकारी राधेश्याम खोब्रागडे व इतर स्थानापन्न झाले आहेत. मागील पदस्थ अशोक गुप्ता, जगदीश गुप्ता, ओमी अग्रवाल, डॉ. राजेंद्र कापगते, परसराम गुप्ता, खुशाल हुकरे आणि स्व. मनोहरराव खेडीकर हे होते व यांनी राजीनामे पण दिले आहेत. प्रकरण असे की सन २०१४ पासूनच या पदाधिकारी आणि विस्वस्तांनी आपला खेळ सुरू केला. विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी यांनी धर्मदाय आयुक्तांकडे पदस्थ नोंद घ्यावी लागते पण तसे न करता स्वयंघोषित पदाधिकारींचा हा कारभार चालत राहिला. सन २०१६ पासून श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान जिर्णोद्धार बांधकामासाठी यांनी अनेक पावत्या छापल्या यात पावत्या बुकांतील पावती क्र. १७, १४ व २० क्रमांकांची नोंद कैशवहीत घेतलेली नाही, तसेच पावती क्र. ०२, ०५, ०६ व सन २०१४ – १५ व २०१६ ची ही कैशवही लेझरवर दाखल केली नाही. यांनी सर्वसाधारण नोटीस ठराव व पावत्याबुकांचे स्टॉक बुकही ठेवले नाही. यांचे संपूर्ण धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारींनूसार मा. अधिक्षक न्याय – सा. न्याय नोंदणी कार्यालय भंडारा यांनी दि. ०९/१२/२०२२ ला ट्रस्टला अध्यक्ष, सचिव व विश्ववस्तांना यांचा संपूर्ण पावत्यांचे स्पष्टीकरण पत्र देऊन मागितले होते. आता तीनदा शंभराहून अधिक स्वाक्षऱ्यांसह तक्रारदार आता यांना सर्व पावत्यांच्या प्रथम हिशोब तपशिलवार जनतेसमोर मागित आहेत. काही जागृत तक्रारदारांना यांनी टाळाटाळ करीत “आप हिसाब मांगने वाले होते कौन हो” सब बराबर हो गया आप को क्युं दिखाऐ” या शब्दाचा वापर करून प्रकरण टाळीत गेले असा पुंडलिक कवासे, विजय शेंडे, तुळशीराम भुरे व अन्य स्वाक्षऱ्यांसह भक्तजनतेचा संतप्त आरोप आहे. आता या प्रकरणात पहिली तक्रार मठ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिव यांना ५० च्या वर स्वाक्षऱ्यांसह २०/०१/२०२० ला दिली यांचे उत्तर शून्य, मग दूसरी तक्रार स्मरणपत्र ०२/०३/२०२० ला दिली तरीही उत्तर शून्य. मग ०१/१०/२०२१ ला ज्या विभाग अंतर्गत ही धार्मिक स्थळ येते मा. धर्मदाय आयुक्त भंडारा यांकडे ७० ते ८० स्वाक्षऱ्यांसह तक्रार दाखल केली. आणि नुकतेच दि. ०९/१२/२०२२ ला न्यायालयाने यांना या संपूर्ण गहाळ पावत्यांचे स्पष्टीकरण मागितले.

या मठ देवस्थान ट्रस्टमधे हजारों भक्तांनी आजपर्यंत कितीतरी देणगी, दरवर्षी उत्सवात देणगीतून लाखोंच्या वर रूपयांची प्राप्ती होते पण एकही देणगीदार भक्त, सदस्यांना घेऊन मासिक, त्रैमासिक अथवा सहामाही सर्वसाधारण सभेचेही आयोजन होत नाही. यातच भक्तभाविकांची शंकेची पाल चुकचुकली आणि हा संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आला.

यांनी महाप्रसाद अन्नदान जमा झालेले तांदूळही एकोडीच्या एका राईसमिलमधे विकले तीही रक्कम रेकॉर्डला का जमा झालेली नाही.? मठ मंदीर परीसरातील लाखोंच्या वर सागवान वृक्षे तोडून ती एका ( नाव न सांगण्याच्या अटीवर ) साडेचार लाखात न देता अन्य व्यक्तीला ५ लाखांत विकली, याचीही रक्कम रेकॉर्डवर चढविली काय.? तोडण्यासाठी परवानगी धर्मदाय आयुक्तांकडून घेतली का.? घेतली तर ती परवानगी पत्र कुठे आहे.? पावती बुक क्रमांक ०४ – २०१ पासून कुठे गायब आहे.? त्यात कुणी कुणी किती अवैध वसुली करून किती धन जमा केलीत.? हा पण तक्रारदारांचा संतप्त खडा सवाल आहे.तसेच पावती बुक क्रमांक ०५ व ०६ का बरं गहाळ आहे.? ती दोन्ही बुक कुणाची नावे दिली होती.? तो व्यक्ती कोण.? असाही आरोप यांवर होत आहे. जनप्रतिनिधी आ. नाना पटोले, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार डॉ परीणय फुके यांनीही उत्सवकाळात एकुण किती कैश व कितींचे चेक दिलेत त्यांचीही नोंद ट्रस्टला रेकॉर्डमधे घेऊन धर्मदाय आयुक्तांकडे नोंदी घेतलीत काय.? एका माजी आमदारांचा ११ हजारांचा चेक एका पदस्थ शातिरमाईंडने आपल्या वैयक्तिक बॅंक खात्यात का वळविले होते.? विचारले असता जाहिराती बहाणा करून प्रकरण का टाळले होते.? ते महाशय कोण.? श्री संत लहरीबाबा उत्सव प्राणप्रतिष्ठा पुजन सोहळा २०१६ – १७ १८ मधील एक प्रतिष्ठित वैद्यकीय हॉस्पिटल देणगी ११,०००, एग्रो कृषि संचालक ११,०००, टायर शोरूम संचालक स्व. गोखले ११,१११, श्री स्वामी कंत्राट कंपनी २१,०००, गहाणे २१,०००, किराणा उमेश स्टोर्स ११,०००, विर्शी गुप्त देण २१,००० व एक नामांकित मेडीकल ११,००० ही रक्कम सुद्धा स्विकारून मठ देवस्थानानात रेकॉर्डला जमा का नाही.? व यांची बैनरवर देणगीदाते नावे का नाही.? याची माहिती धर्मदाय आयुक्तांकडे दिली काय.? आणि देणगीदार नावे, स्व. मृत पावलेल्या स्मृती प्रित्यर्थ नावांची लाखोंच्या देणग्या स्विकारून टाईल्स व बैनरवर का नावे प्रकाशित केले नाहीत.? श्री संत लहरीबाबा मंदीरात अव्याढव्य रूपाने गुप्तधन येते ती ही रक्कम सन २०१२ ते २०२२ पर्यंत किती जमा झाली.? एकदाही मिटींग घेत हा विषय ठेवला काय.? का नाही ठेवला.? कुणा पदस्थ म्होरक्यांच्या म्हणन्याने हा विषय मांडलेला नाही.? आणि गुप्तधन विषयी मा. धर्मदाय आयुक्तांकडे यांचा किती आकडा की आकडा गेलाच नाही.? कुणी हे प्रकरण दाबले.? मठ देवस्थान येथे देणगीदार नावे बैनरवर, भिंतींवर कोरण्याची व छापण्याची प्रथा कशी व कुणी बंद केली.? आणि का बंद केली याची नोंद व जमा देणगीदार, स्व. स्मृती प्रित्यर्थ किती महाधन स्विकारले.? याचीही मठ देवस्थान ट्रस्टला पूर्ण रक्कम रेकॉर्डवर चढविली काय.? व धर्मदाय आयुक्तांकडे यांची नोंद व तपशिलवार हिशोब सादर केला काय.? एका भंडारा एस. गुप्ता व्यापारीने स्वदान खर्चातून मंदीरात टाईल्स फिटींग दान केले पण या टाईल्सांचीही बिले, साध्या कपबश्यांचीही बिले या शातिर पापी महाशयांनी ट्रस्टमधून खोटी बिले लावित पैश्यांची अफरातफर केली असा हे प्रकरणे त्यांनी स्व: डोळ्यांनी पाहून सर्व येथील हे जागरूक भक्तगण सणसणीत आरोप करीत आहेत आणि हे सर्व प्रकरणे १००% टक्के सत्य स्थिती आहेच असे ठामपणे म्हणाले. असे अनेक व सर्व देणगी पावत्यांच्या घोळांमधील प्रकरणांणा आज संपूर्ण तपशिलवार हिशोब सर्व देणगीदार भक्त सदस्यांना, दानदाते, टाईल्स दाते, देणगीदार शहरवासीयांसमोर दाखवित जनतेच्या मनातील शंका दूर करावी. आणि एका जागृत आणि साकोलीचे आराध्य प्रथम श्रद्धास्थान असलेल्या या पवित्र श्री संत लहरीबाबा मठ मंदीरात अश्या प्रकारे अपवित्र आणि भक्तिमय वातावरण मलिन करणा-या सर्व दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येऊन सर्व या आराध्य दैवत संत श्री लहरीबाबा मठ मंदीरांची जन सहयोगातून देणगी जमा झालेली लाखोंच्या वर करोंडो रूपयांची अफरातफर सर्व रक्कम यांकडून वसूल केली जावी हाच आमचा खरा विजय आणि श्री संत लहरीबाबांचा जयजयकार विजय असेल असे आज शेकडोंच्या वर श्री लहरीबाबा भक्तभाविकांनी ही एकच मागणी केली असून जर यात पूर्ण पारदर्शकपणे चौकशी झाली तर करोडोंच्या वर बेहिशोबी संपत्ती मालमत्ता बाहेर निघून मोठे मासे या धार्मिक संस्थेतील महाभ्रष्टाचार घोटाळ्यात अडकणार असल्याचे भक्तभाविक जनतेत हेच भाकीत ठरेल हे अति उल्लेखनीय..!

प्रतिक्रिया / स्टेटमेंट –

( ०१ ) ” या सर्व गैरव्यवहारात काहीच झाले नाही, एखाद्या पावत्या चुकीचे झाले असेल व होऊ शकते, तुली इंटरनॅशनल हॉटेलमधे चौकशीसाठी साकोलीत आलेल्या अधिका-यांना जेवणासाठी मी घेऊन गेलेलो नव्हतो दूस-याने नेले होते व तेथे मला काही माहित नाही. ही सर्व आम्हाला बदनाम करण्याची बनवाबनवी आहे ” — अशोक गुप्ता • तत्कालीन अध्यक्ष – श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्ट साकोली.

( ०२ ) ” सब बकवास है, वैसा कुछ भी नहीं है, मी तर आताच २०१९ ला नवा आलो मला काही माहित नाही, पण हिशोब सब बराबर है, जे जूने होते ते हा प्रकार पहातील, ज्यांनी छापले त्यांना आम्ही नोटीस देऊ ना ” — प्रभाकर सपाटे – विश्वस्त मंडळ – श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्ट साकोली.