वडद फाटा श्री हनुमान मंदिरात हजारों भक्तांनी घेतला महाप्रसाद

90

वडद फाटा श्री हनुमान मंदिरात हजारों भक्तांनी घेतला महाप्रसाद

छत्रपती ग्रुप साकोलीतर्फे आयोजन

साकोली / महाराष्ट्र
06.04.2023
रिपोर्ट – आशिष चेडगे • संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली : गुरुवार ०६ एप्रिलला जवळील वडद फाटा येथे श्री हनुमान मंदिरात छत्रपती ग्रुप तर्फे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त गोपालकालाचे आयोजन झाले. येथे लाखांदूर रोड – वडद टि पॉईंट बस थांबा चौकात हजारो भक्तभाविक व प्रवाशांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Read more news 👇👇👇


पिसाळल्या माकडांसाठी वनविभागाचे शॉर्प शुटर साकोलीत दाखल


 

दू. १२ पासून गोपालकाला,श्रींची महाआरती पश्चात भक्तभाविकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर श्री हनुमान मंदिरात तब्बल १० वर्षांपासून हे धार्मिक कार्यात छत्रपती ग्रुप अग्रेसर असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. या कार्यक्रमाला आमदार नाना पटोले यांनीही आपल्या दौरा दरम्यान सहकाऱ्यांसह हजेरी लावली, उपस्थितांमधे सरपंचा माधवी बडवाईक, अपर्णा मासुरकर, पोलीस निरीक्षक राजेश थोरात, उपसरपंच कुंभली डॉ. अनिल शेंडे, पोलीस नायक अमितेश वडेट्टीवार, प्रदीप मासुरकर,बंडू शेंडे, डॉ. नितीन गुप्ता, आदी उपस्थित होते. येथे आत्मप्रवर्तक भजनी मंडळ वडद भजनसंच यांनी गोपाल काला सादर केला. या कार्यक्रमात छत्रपती ग्रुपचे उमेश भुरे, विनायक देशमुख, ओमप्रकाश गायकवाड, विजय दूबे, ग्यानीराम गोबाडे, विक्की राऊत, पिंटू परशुरामकर, जे.डी. मेश्राम, नंदू गेडाम, सुरेश बघेल, पंकज वासनिक, शुभम देशमुख, वरूण कळपते, रूपचंद टेंभुर्णे, अरविंद डुंभरे, प्रसन्न गुप्ता, संदीप गुप्ता, दिलीप मासुरकर, नरेश गणविर, प्रितीश गजभिये, जावेद शेख, इमरान खान, मस्जिदभाई कच्छी, देवचंद चांदेवार, आनंद नंदागवळी, भास्कर खोब्रागडे यांनी आयोजन केले होते. यात प्रदीप झिंगरे, संदीप कोल्हे, राकेश बडवाईक, पुजारी प्रकाश तुमडाम, मोरेश्वर बागडे, सचिन गोडशेलवार, भोजराज बडवाईक, यादव तुरईवार, राकेश गोडशेलवार, दिनानाथ बडवाईक व अजय नागले यांनी महाप्रसाद वितरण आणि प्रसाद व्यवस्थेत मोलाचे योगदान दिले तर प्रसारण सेवा साकोली मिडीया नेटवर्कने केले.