कुंभलीत श्री हनुमान मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न
साकोली पोलीसांची तडकाफडकी एक्शनने गावात राखली शांतता
साकोली / महाराष्ट्र
दि. 04.04.2023
रिपोर्ट : आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी : साकोली : जवळील कुंभली येथे शनिवार ( दि.०१.) रात्री ०२:३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला असणाऱ्या शौचालय समोर व कचराकुंडीच्या बाजूला चिचवा झाडाखाली श्री हनुमानजी मूर्तीची स्थापना केली. झाडाखाली सिमेंटचे दोन रिंग व त्यामध्ये माती भरून टाकून फरशी मांडीत त्यावर श्री हनुमानजींची मूर्ती मांडून लाल कापड बांधण्यात आले. रविवार दिनांक ०२ एप्रिलला पहाटे सुमारास नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. शौचालयाच्या समोर श्री हनुमानजीची मूर्ती पाहून धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी साकोली पोलीस स्टेशनला ही माहिती कळताच पोलीस स्टेशनच्या वतीने प्रथम नागरिक सरपंच उमेद गोडसे यांना ही मूर्ती सरकारी जागेवर असल्याने व कुठलीही परवानगी न घेता मांडल्यामुळे ती मूर्ती तिथून उचलण्याचे आदेश देण्यात आले. सरपंचांनी ती मूर्ती उचलून ऑटोत नेत असताना गावकऱ्यांनी नेण्यास मज्जाव केला त्यामुळे पोलिसांनी त्वरित गावात शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी मूर्तीला साकोली पोलीस स्टेशनला आणून पुज्यस्थळी विधीवत ठेवली. परंतु गावामध्ये मात्र हिंदूंच्या देवतेचे अपमान केला त्यामुळे गावकऱ्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी साकोली पोलीस स्टेशनमध्ये केली साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हवालदार राजेश कूरूडकर, गुलाब घासले, पोलीस अंमलदार मधुकर शेंडे, पोलीस अंमलदार मुकेश पटले, यांनी त्वरित कुंभली येथे तातडीने धाव घेत परीस्थिती हाताळून गावात शांतता राखण्यासाठी मदत केली. पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांनी अज्ञात व्यक्तिविरूध्द कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले आहे. त्यामुळे कुंभली गावात पोलीसांच्या या तडकाफडकी एक्शनने गावात शांतता व सुव्यवस्था कायम आहे.