श्रीरामनवमीला साकोली नगरी झाली अविस्मरणीय भगवामय

84

श्रीरामनवमीला साकोली नगरी झाली अविस्मरणीय भगवामय

पोलीसांची होती करडी नजर ; शोभायात्रेत उसळला भव्य जनसागर

साकोली / महाराष्ट्र
दि: 31.03.2023
रिपोर्ट : आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी – साकोली : श्रीराम नवमी निमित्त ( ३० मार्च.) साकोली – सेंदूरवाफा शहरातील निघालेल्या भव्य शोभायात्रेत प्रत्येक चौक प्रत्येक रोड सायंकाळी अविस्मरणीय भगवामय झाला, तर जागोजागी रोडच्या दोन्ही बाजूला जनतेचा जनसागर उसळला. चौकाचौकात शरबत, महाप्रसाद व थंड पाणी वितरणांचे भक्तभाविकांसाठी स्टॉल लागलेले होते. या दरम्यान साकोली पोलीसांची संपूर्ण शोभायात्रा भ्रमणावर तीक्ष्ण नजर होती.
झेंडा चौक सेंदूरवाफा येथून सायंकाळी निघालेल्या भव्य शोभायात्रेत प्रथमच महाबली हनुमान वेषभूषेत पात्रधारी व अश्वारूढ झाशीची राणी लक्ष्मीबाई हे विशेष आकर्षण ठरले. खास महिलांसाठी ढोल ताशा पथक, लेजर प्रकाश डिजे ट्रक झांकी वर नृत्य आकर्षण, रथावर राम दरबार, वानरसेनेतील जटायू, सुग्रीव, वरूण देव श्री झुलेलाल वेषभूषा, नरहरी महाराज मंदिर समिती देखावा, ओमर वैश्य समाज, फ्रिडम युथ फाऊंडेशन समिती, योग वेदांत सेवा समिती आणि विविध धार्मिक संघटनांनी शोभायात्रेत ट्रॅक्टरवर रामायणातील व्यक्तिरेखा, जेसीबी वर महाबली हनुमान, श्रीराम, लक्ष्मण, सितामाता वेषभूषा अश्या विविध देखाव्यांनी व लेजर प्रकाशात उच्च ध्वनी डिजे वाद्यांवर “श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में…भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेना…रामजी की निकली सवारी.. जगदंब..जगदंब..जय भवानी..जय शिवराय” अश्या गितांवर भव्य जनसागरात हजारांवर युवा जय श्रीराम घोषणांनी परिसर दणाणून सोडला हे उल्लेखनीय व हा हिंदूमय जोश शहरवासीयांसाठी विशेष आकर्षण व गर्वाचा ठरला. सदर भव्य शोभायात्रा लाखांदूर रोड चौकात येताच एकच भगवामय जल्लोष साजरा करण्यात आला. येथे श्रीराम हिंदू युवा मंच साकोली कडून सर्व भक्तभाविकांसाठी महाप्रसाद आणि शरबत वितरण करण्यात आले. शोभायात्रेची सांगता श्रीराम भक्त हनुमान मंदिर तलाव वार्ड येथे महाआरती करण्यात येऊन आकाशतरंगात भव्य फटाका शो नी आकाशात जणू ७ मिनिटे दिपोत्सव सुरु होता. संपूर्ण ४ ते ५ किलोमीटर अंतरातील शोभायात्रेत साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनात ३ पोलीस उपनिरीक्षक, ०५ अंमलदार, १० पोलीस नायक, ०४ महिला पोलीस, २४ होमगार्ड पथकांचा चोख व करडी नजरेत बंदोबस्त लागला होता. मुख्य मार्गांवर वाहतूक पोलीस व होमगार्ड पथकांनी वाहतूक संचलन सुव्यवस्थितात कर्तव्यदक्ष हजर होते.

पुर्ण विडियो पहा👇👇👇


साकोलीत ही शोभायात्रा प्रथमच भव्य दिव्य आणि अविस्मरणीय आठवण होऊन राहिल असे चौकाचौकात प्रत्येक जनसागरात महिला पुरुषांनी आयोजकांचे कौतुक करीत बोलून दाखवले हे विशेष. श्रीराम नवमी जन्मोत्सव शोभायात्रेत – श्रीरामनवमी शोभायात्रा समिती साकोली / सेंदूरवाफा सर्व आयोजन मंडळी आरोग्य सेवेचे वैद्यकीय मंडळी, शिक्षण महर्षी, उद्योगपती मान्यवर, व्यापारी वर्ग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय नेते व पुढारी, कंत्राटदार मंडळी, शासकीय अधिकारी वर्ग, ट्रैक्टर्स विक्री संचालक, शाळा महाविद्यालये संस्थापक, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडीया पत्रकार सदस्य, विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्यांनी या आयोजनात विशेष योगदान देऊन श्रीराम जन्मोत्सव सोहळा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. या शोभायात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्वतः प्रत्येक विविध आकर्षण देखाव्यात सामिल होऊन “रामजी की निकली सवारी” डिजे वाद्यांवर नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही आणि २ ते ३ मिनिटे युवकांसोबत त्यांच्या घोळक्यात जात चक्क नृत्य केले. प्रगती कॉलनी चौकात माजी आमदार राजेश ( बाळा ) काशिवार हे सुध्दा महाप्रसाद व शरबत वितरण स्टॉलवर हजर होत शोभायात्रेतील भक्तभाविकांचे हार्दिक स्वागत करीत स्वहातांनी महाप्रसाद वितरीत केला हे विशेष.