साकोलीत यंदा विशालकाय पवनसुत श्री हनुमान श्रीराम नवमी शोभायात्रेत विशेष आकर्षण

62

साकोलीत यंदा विशालकाय पवनसुत श्री हनुमान श्रीराम नवमी शोभायात्रेत विशेष आकर्षण

30 मार्चला अख्खं साकोली सेंदूरवाफा शहर जय श्रीराम घोषणांनी भगवेमय होणार

साकोली / महाराष्ट्र
दि. 28.03.2023
रिपोर्ट आशिष चेडगे ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली : येत्या गुरुवारी ३० मार्च सायंकाळी ६ वाजता पासून साकोली सेंदूरवाफा शहरातील शोभायात्रेत विशालकाय बलाढ्य पवनसुत श्री बजरंगबली हे विशेष आकर्षण असून प्रत्येक चौक, प्रत्येक प्रत्येक प्रभाग, प्रत्येक रस्ते हे जय श्रीराम घोषणांनी दुमदुमून जाईल आणि सर्वत्र भगवामय परीधान केलेल्या पोषाखांनी रंगून जाणार. कारण यंदा श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती साकोली सेंदूरवाफा वतीने विशेष आकर्षण लेजर प्रकाशात उच्च ध्वनी यंत्रणा आणि विविध आकर्षक देखावा सादर करणार असून मागील वर्षीच्या प्रचंड जनप्रतिसाद बघता यावर्षी दुप्पट आणि अथांग जनसागर या भव्य शोभायात्रेला उसळणार आहे. विशेष करून आयोजन समितीने समस्त साकोली सेंदूरवाफा शहरातील जनतेला व खास महिलांसाठी ढोल ताशा पथक असून सहपरीवार याचा लाभ घ्यावा आणि युवा विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की जास्तीत जास्त संख्येने या विशाल शोभायात्रेत सहभागी होऊन श्रीराम जन्मोत्सव सोहळा आनंदाने पार पाडावा. या भव्य शोभायात्रेला वाहतूक व्यवस्था आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीसांची नियुक्ती करण्यात आली असून शोभायात्रेत मद्य पिऊन धिंगाणा घालणे, अश्लिल हातवारे करणे, विनाकारण वैरीपण काढत भांडणे करणे असे कृत्य आढळल्यास तातडीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून अटक केली जाईल असे साकोली मिडीयावर पोलीस ठाणे निरीक्षक राजेश थोरात यांनी सांगितले आहे.