साकोलीत बालवाडी पदवी दिन साजरा
अकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कुलचा नाविन्यपूर्ण उपक्रम
साकोली / महाराष्ट्र
24.03.2023
आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी : साकोली : स्थानिक अकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कुल (एकोडी रोड) साकोली येथे ( २४ मार्च ) ला बालवाडी पदवी दिन मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला.
Read more news 👇👇👇
साकोलीत दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
पुर्व प्राथमिक नर्सरी,के.जी.१,के.जी.२ च्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि मनोबल उंचावण्यासाठी, त्यांच्या नविन प्रवासाचे प्रतिक म्हणून त्यांचा पदवी दिन आयोजित करण्यात आला. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले चिमुकले विद्यार्थ्यी त्यांच्या पदवी कॅप्स घेण्यासाठी मोठ्या आत्मविश्वासाने व्यासपिठावर पदार्पण करीत होते. शाळा व्यवस्थापक जी.एच.ठाकरे यांच्यासह मुख्याध्यापिका स्मिता घोरमोडे ह्यांनी पदवीचे प्रमाणपत्र बहाल करून अभिनंदन केले आणि त्यांचा आनंद द्विगुणित केला. लहान पदवी- धरानी त्यांच्या शाळेच्या मुख्य प्रवाहात आपले शिक्षण पुर्ववत सुरू ठेवले. विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरेनुसार लोकसंस्कृती चे जतन करून मराठी अस्मिता अबाधित ठेवून,नववर्षाच्या उंबरठ्यावर मराठी नववर्षाचे औचित्य साधून अकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कुल च्या वतीने दरवर्षीप्रमाने नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा केला.
यशस्वीतेसाठी शिवाली गुप्ता, ममता सरोदे, दिक्षा गेडाम, धनराज मेश्राम, निखिल निंबेंकर, सचिन मारवाडे, धर्मेंद्र वलथरे, मोहन रहीमतकर, अतुल नंदेश्वर, कमलेश वासनिक, विद्यासागर तिरपुडे, शरद कोसरे, सारीका ठाकरे, विजया पडोळे,निशा रामटेके नंदा कापगते,मृनाली कोसे, पुनम वाडीभस्मे, रेश्मा ढोमणे, प्रिती धुर्वे, मालती इरले, मयुरी हटवार, कृपाली राऊत, पुष्पलता आसलवार, शिरिन शेख, पल्लवी कांबळे,लता कटरे, श्रमिका पातोडे, श्रुनाली जंवजाळ,छाया राऊत, रिता कुंभारे करिश्मा बिसेन, केतन सर वैशाली मारवाडे ह्यांनी अथक परिश्रम घेतले.