साकोलीत दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

136

साकोलीत दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

चोरांची सीसीटीव्ही फोटो व्हॉयरल ; पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांचे मिडीयावर पुन्हा वारंवार जनतेला आवाहन

साकोली / महाराष्ट्र

दि. 24.03.2023

रिपोर्ट : आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र

सविस्तर बातमी :- साकोली : सेंदूरवाफा येथे गजानन महाराज मंदिर जवळ राहणाऱ्या लता विजय मेश्राम वय 35 यांच्या घरी ( 23 मार्च ) एक अनोळखी इसम दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आला व त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र पॉलिश करून देतो म्हणत फसवणूक करून दोन ग्राम त्याची किंमत सुमारे 12 हजार रुपये आहे ते लंपास केले, गुरुवार दि. 23 मार्च दु. 12.30 दरम्यान एक अनोळखी इसम लता मेश्राम यांच्या घरी आला व दागिने पॉलिश करून चमकून देतो असे म्हणत त्यांनी लता मेश्राम यांची फसवणूक केली लता मेश्राम यांनी नाही म्हणत असतानाही त्यांना गोष्टीत गुंतवूण त्यांच्या जवळील मंगळसूत्र घेतले ज्यामध्ये डोरले व मणी असे एकूण दोन ग्राम सोने होते त्याला चमकून देतो म्हणत त्यांनी महिलेला काही समजण्याच्या आत आजूबाजूला मोटरसायकलवर स्वार असणाऱ्या त्यांच्या सोबत्यांच्या गाडीवर बसून पोबारा केला लता मेश्राम यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी साकोली पोलीस स्टेशनला अज्ञात चोराविरूध्द तक्रार केली साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही कॅमेरात मोटरसायकलवर बसणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींचे फोटो व्हायरल केले असून फोटोत दिसणारे वर्णनाचे व्यक्ती आढळल्यास साकोली पोलीस स्टेशनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे कोणीही अनोळखी व्यक्ती घरी दरासमोर आल्यास त्याला त्याच्याशी आर्थिक व्यवहार करू नये व अनोळखी व्यक्तींची हालचाल संशयास्पद वाटल्यास लगेच साकोली पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांनी केले आहे. विशेष म्हणजे साकोली पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांनी 6 दिवसांपूर्वीही साकोली मिडीयावरून जनतेला अश्या घटनांबाबद सावधान रहाण्याबाबद आवाहन केले होते की तुमच्या दारात अनोळखी इसम दिसल्यास व काही शंका निर्माण झाल्यास तातडीने पोलीस ठाणे साकोली हेल्पलाईन क्रमांक 07186 – 236133 वर कॉल करावा असे पोलीस विभाग वारंवार सौशल मिडीयावरून विनंती आवाहन करून सुद्धा काही निष्काळजी करणारे असे नागरीक याचा बळी ठरत आहेत. पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांनी पुन्हा एकदा जनतेला आवाहन केले की अशा प्रकारच्या घटनांशी संबंधित काही अनोळखी इसम, महिला विविध वस्तु विकणारे अथवा परराज्यातील फेरीवाले यांची पूर्ण आधारकार्डसह कागदोपत्री पडताळणी करूनच व्यवहार करावा काही शंका वाटल्यास तातडीने पोलीस ठाणे वरील क्रमांकावर यांची सुचना द्यावी असे पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांनी साकोली मिडीयावरून जनतेला आवाहन केले आहे.