फिल्म अभिनेता बॉलिवूड टार्जन हेमंत बिर्जे पहाण्यासाठी शंकरपटात नागरीकांची तोबा गर्दी.

111

फिल्म अभिनेता बॉलिवूड टार्जन हेमंत बिर्जे पहाण्यासाठी शंकरपटात नागरीकांची तोबा गर्दी

• स्व. निर्धनराव पाटील वाघाये स्मृतिप्रित्यर्थ केसलवाडा/वाघ. येथे दूस-या दिवशीही धावल्या असंख्य ” हुर्रर्रर्रर्र ” बैलजोड्या • 

साकोली/महाराष्ट्र
17.03.2023
रिपोर्ट:- आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र •

साकोली : स्व. निर्धनराव पाटील वाघाये आणि स्व. लक्ष्मीबाई निर्धनराव वाघाये स्मृती प्रित्यर्थ केसलवाडा/वाघ. येथे ( १६ मार्च ) ला भव्य इनामी शंकरपटाला फिल्म अभिनेता बॉलिवूड टार्जन हेमंत बिर्जे यांनी हजेरी लावित स्वतः बैलजोडी वर बसून पटाचा आनंद घेतला. हेमंत बिर्जेला पहाण्यासाठी नागरीकांनी तोबा गर्दी केली होती.

तीन दिवसीय शंकरपटाला दूस-या दिवशीही असंख्य बैलजोड्या हुर्रर्रर्रर्रर्र धावल्या पटदाण दोन्ही बाजूला तीन हजारांवर नागरीकांनी तुफान गर्दीत बैलजोड्यांच्या “हुर्रर्रर्रर्रर्रर्रर्र” आक्रोशांमध्ये बॉलिवूड टार्जन अभिनेता हेमंत बिर्जे यांना जवळून पाहण्याचा व त्यांचा मोबाईलमधे फोटो काढून आस्वाद घेतला. शंकरपटात यांसह महेश नाईक, माजी आमदार सेवकभाऊ वाघाये, सौ. सरोजताई वाघाये, विजय वाघाये, जि.प. महिला बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, नरेंद्र वाघाये, आदित्य वाघाये, अजिंक्य वाघाये, विजय वाघाये, अजय वाघाये, विजय का. वाघाये, जयंत वाघाये, हरीभाऊ खोडपे, दिनेश वाघाये हे सोबतीला होते. फिल्म अभिनेता बॉलिवूड टार्जन हेमंत बिर्जेला पहाण्यासाठी नागरीकांनी दोन्ही बाजूला तोबा गर्दी करीत हेमंत बिर्जे सोबत हस्तांदोलन व फोटो काढण्याची जणू स्पर्धा लागली होती. अभिनेता हेमंत बिर्जे स्वतः बैलजोडीवर माजी आमदार सेवकभाऊ वाघाये यांसोबत बसून शंकरपटाचा मनसोक्त आनंद लुटला. अभिनेता हेमंत बिर्जे यांनी यावेळी साकोली मिडीयाचे ” विशिष्ट छायाचित्रण ” पाहून साकोली मिडीया नेटवर्क चीफ एडीटर प्रेस संपादक पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांचेशी ५ मिनीटे निवांतपणे कैमेरा कलेविषयी संवाद साधत सर्व कैप्शन पब्लिक प्रतिसादेच्या फोटोग्राफी आपल्याकडे घेत मुंबईला घेऊन गेले आणि साकोली मिडीयाच्या फोटोग्राफीचे कलात्मक कौतुकही केले. आज या भव्य शंकरपटाचा फायनल असून आजही पटशौकीनांची तुफान गर्दी पहावयास मिळेल.