आदिवासी बिंझवार इंझवार समाज साकोलीतून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार
सेंदूरवाफा येथे समाजबांधवांची सभा संपन्न • छत्तीसगड मध्यप्रदेशातील अतिथी साकोलीत दाखल
साकोली/महाराष्ट्र
12.03.2023
रिपोर्ट:- आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी साकोली : आदिवासी बिंझवार इंझवार समाज जात प्रमाणपत्रासाठी व आपल्या न्यायहक्कासाठी लवकरच साकोलीत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असा तिव्र इशारा ( १२ मार्च ) सेंदूरवाफा येथे झालेल्या सभेत अध्यक्ष काशिराम वाहारे यांनी दिला. या सभेत महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्यप्रदेशातील समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.
सविस्तर की मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७/०८/२००६ ला आदिवासी बिंझवार इंझवार समाज समिती नागपूर यांनी दाखल केलेल्या दावा क्र. १०७८/२००५ निकाली काढतांना आदिवासी बिंझवार व इंझवार दोन वेगळ्या जमाती नसून एकच असल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत बिंझवार जातीचे नसून जमातीच्या तत्सम जमात म्हणून समावेश करण्याबाबतचा आदेश देऊन १६ आठवड्याच्या आत तसा अहवाल केंद्र शासनास पाठविण्याचा स्पष्ट सुचना देऊनही आजपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. यामुळे आदिवासी बिंझवार इंझवार समाजातबांधवांचे जात प्रमाणपत्रासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पण आता समाज शांत बसणार नाही व रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असा तिव्र इशारा दिला. या सभेत समाजाचे नागपूर विभागीय अध्यक्ष काशिराम वाहारे, सचिव अविनाश नेवारे, उपाध्यक्ष बाबुराव सोनवाने, प्रकाश शाहारे, कोषाध्यक्ष मधूकर सोनवाने, छत्तीसगड – मध्यप्रदेश येथून आलेले पाहुणे नायक गौतम, दशरथ बिल्ला, महाराष्ट्र प्रांत कार्याध्यक्ष वामन शेळमाके, प्रेमसागर बिडवार बालाघाट, निशा सोनवाने, परमदास शहारे, पुष्पराज बिंझवार, मुन्नालल गौतम, नंदू बोपचे, रामदयल बिंझवार, शिवनी, कमलेश अट्टेवार, संतलाल शहारे, नगरपंचायत लाखनी सदस्य सविता सोनवाने, अक्षय मानापुरे बालाघाट, गोपाल शहारे, राजकूमार शेंडे, शशिकांत सोनवणे, आशिष तायडे, हेमराज कावळे, राजू सोनवाने आदी मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की आम्ही शासनाचे आदिवासी बिंझवार इंझवार समाजातील बांधवांच्या न्याय हक्कासाठी २५ वर्षांपासून लक्ष केंद्रित करीत आहोत आणि छत्तीसगड राज्यातील या आंदोलनाला यश मिळाले असून आता महाराष्ट्रात समाजबांधव खवळून उठेल. समाजातील न्यायहक्कासाठी आता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार आणि साकोलीतून ही हक्कासाठी लढाई सुरू करीत आहोत यासाठी समाजबांधवांनी “एक तीर एक कमान.. आदिवासी एक समान” बनून लढ्यात पुढाकाराने अग्रेसर असणे आवश्यक आहे. २००१ पासून दिल्ली संसदेच्या दालनात हे प्रकरण दाखल असून जर शासनाने तातडीने लक्ष दिले नाही तर समाजबांधव पेटून उठेल व आदिवासी बिंझवार इंझवार समाजातबांधवांचे रक्त गरम करू नका असा संतापजनक इशारा येथे देण्यात आला. सभेत संचालन सचिव अविनाश नेवारे तर आभार उपाध्यक्ष बाबुराव सोनवाने यांनी केले.
हि सभा यशस्वी करण्यासाठी व मध्यप्रदेशात छत्तीसगड येथील पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी साकोली फ्रिडम युथ फाऊंडेशन सचिव कार्तिक लांजेवार, किशोर शहारे, राहुल वायरे, विलास बागडे, ओमप्रकाश शहारे, विष्णू चौधरी, अशोक चौधरी, नरेश बागडे, प्रणय बागडे, जितेंद्र सोनवाने, विनोद सोनवाने, चेतन शहारे, गौरव सोनवाने, आशिष वायरे, दिपक उईके आणि आदिवासी बिंझवार इंझवार समाजातील पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. या सभेला छत्तीसगड मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील ३०० च्या वर समाजबांधव उपस्थित होते.