प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा साकोलीत विकासकांचा श्रीगणेशा

89

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा साकोलीत विकासकांचा श्रीगणेशा

शहरातील विविध नविन जनविकासकांमांची दिली सौगात 

 

साकोली/ महाराष्ट्र

दि. २२ फेब्रुवारी २०२३

आशिष चेडगे संवाददाता • ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी साकोली : साकोली नगरपरीषद अंतर्गत शहरातील विविध क्षेत्रातील विकासकामांना गति देण्यासाठी नुकतेच कांग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अश्र्विन नशिने यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांसह साकोली दौरा करीत नगरपरीषद मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यांना आमदार नाना पटोले यांनी निर्देश देत अतिशिघ्र विकासकामांना मंजुरी देऊन पूर्णत्वास न्यावी असे जाहीर केले.

शहरातील शिवाजी वार्ड झेंडा चौक सौंदर्यीकरण, चबुतरा सौंदर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील सभामंडप, याचबरोबर सर्व शहरातील सौंदर्यासाठी योजना यात प्रत्येक सुटलेले गरजवंत गोरगरीबांना घरकुल, नाली बांधकाम, नळयोजना, सुसज्ज पारदर्शक रस्ते, तसेच हनुमान मंदिर ते गडकुंभली रोड जाणा-या रस्ता व इतर अविकासमय क्षेत्रात पाहणी करून जागोजागी बैठकी घेत जनतेशी थेट संवाद साधला आणि साकोली नगरपरीषद मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांना निर्देश दिले की अतितातडीने सदर सर्व प्रभागातील सौंदर्य व विकासकामे पारदर्शकपणे मार्गी लावण्यासाठी निर्देश दिलेत. आमदार नाना पटोले यांच्या या दौऱ्याने साकोली शहरातील विविध क्षेत्रातील उर्वरीत कामांना आता विकासाची नवसंजीवनी मिळाली असून गेल्या ५ वर्षात न झालेली व खोळंंबलेली कामे आता पारदर्शकपणे मार्गी लागतील असा विश्वासही जनतेने प्रदान केला. या एकदिवसीय दौ-यावत शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अश्र्विन नशिने, उमेश कठाणे, जितेंद्र नशिने, सतिश रंगारी, ओम गायकवाड, विजय दूबे, नेहा रंगारी, रूपलाल वलथरे, जयश्री भानारकर, प्रमोद मडावी, नयन पटेल, जितेंद्र मेश्राम, महिला काँग्रेसच्या छाया पटले, दिलीप निनावे, जावेद शेख व कांग्रेसचे सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.