भारत भ्रमणवर निघालेल्या आशा मालवीय हिचे साकोली पोलीस ठाणेत स्वागत
२५ हजार कि.मी.चा आहे सायकल प्रवास ; मध्यप्रदेशातील आशाने १ नोव्हें.ला सुरू केला भोपाळहून प्रवास
साकोली/महाराष्ट्र
दि. 22.02.2023
आशिष चेडगे • संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी साकोली : महिला सुरक्षा कायदा आणि महिला सशक्तीकरण याचा व्यापक प्रचार व्हावा यासाठी मध्यप्रदेशातील आशाने १ नोव्हेंबर २०२२ ला राजधानी भोपाळ येथून सायकल प्रवास सुरू करून एक अनोखा विक्रम व संदेश देत निघालेल्या आशा मालवीय या २५ वर्षीय तरूणीने आज ( २२ फेब्रुवारी ) साकोली शहर गाठले. येथे साकोली पोलीस ठाणे येथे हिचा सत्कार करून मानाचा मुजरा देत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात हे अभिमानास्पद गोष्ट.
और खबर पढ़ें 👇👇👇
साकोलीत शिवजयंती निमित्त स्वराज्य ध्वज फलकाचे अनावरण व रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
साकोलीत शिवजयंती निमित्त स्वराज्य ध्वज फलकाचे अनावरण व रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
मूळची मु.पो. नाटाराज तह. खिर्चीपूर जि. राजगढ ( म.प्र.) आशा मालवीय ही राष्ट्रीय खेळाडू असून पर्वतारोही आहे. हिचे मनात संकल्पना आली की आज महिला सशक्तीकरण व महिला सुरक्षा कायदा यांचा देशात व्यापक प्रचार व प्रसार व्हावा करीता हिने हि सायकल यात्रा ०१ नोव्हेंबर २०२२ ला भोपाळहून प्रवास सुरू केला, यात ९ राज्य असून आतापर्यंत ९,३०० कि.मी.चा मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथून हा अभिनव व देशोभिमान संदेश देत प्रवास गाठला. साकोली जिल्हा भंडारा येथे आल्यावर आशा मालवीय हिचा साकोली पोलीस ठाणे अधिकारी राजेशकुमार थोरात यांनी सहर्ष स्वागत करीत सत्कार करून पुढील छत्तीसगड राज्यासाठी प्रवास करीता हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आशा मालवीय हिचा हा सायकल यात्रा समारोप स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२३ ला दिल्ली लाल किल्लावर समारोपीय सत्कारही होणार ही अत्यंत देशोभिमान गर्वाची बाब आहे. साकोली पोलीस ठाणे येथे भारत भ्रमण सायकलस्वार आशा मालवीय हिचा सत्कार करतांना ठाणेदार राजेशकुमार थोरात, पोलीस नायक अमितेश वडेट्टीवार, राजेश बांते, मोहन कन्नाके, राजेश इळमाते, साकोली ग्लोबल महाराष्ट्र मिडीयाचे आशिष चेडगे, होमगार्ड पथक महिला कर्मचारी व पोलीस ठाणे साकोली कर्मचारी वृंद हजर होते.