साकोलीत शिवजयंती निमित्त स्वराज्य ध्वज फलकाचे अनावरण व रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
साकोली / महाराष्ट्र
दि. 21.02.2025
रिपोर्ट:- आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी साकोली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ( १९ फेब्रु.) ला प्रगति कॉलनी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज मुर्तींचे पुजन, स्वराज्य ध्वजाचे अनावरण आणि आमदार नाना पटोले यांनी सक्षम फाऊंडेशनला भेट दिलेल्या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांचे हस्ते संपन्न झाले.
और खबर पढ़ें 👇👇👇
चंद्रपुर जिले के एमआरडीसी (MIDC) की स्टेट बैंक ऑफ इंडिया में डकैती..
वेकोली के बीओसीएम प्रबंधक कार्यालय में ताले तोड़कर हुई चोरी, अज्ञात चोर हुए फरार..
या शिवजयंती निमित्त या सोहळ्याला जि.प. सभापती मदन रामटेके, शहर काँग्रेस अध्यक्ष आश्विन नशिने, महिला तालुका काँग्रेस अध्यक्षा छाया पटले, सुनिता कापगते, अशोक कापगते, शरद कापगते, उमेश कठाणे, इंजि. संदीप बावनकुळे, सुचिता आगाशे, अॅड. मनिष कापगते, चंद्रकांत वडीकार, चुन्नीलाल बोरकर, अनिल डोंगरवार, प्रा. अमोल हलमारे, डॉ. सायली दोनोडे, शेषराव हिवरे, आदी हजर होते. या शिवजयंती सोहळ्यात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन वेषभूषेत लेझीम नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तर येथे लहान बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज वेषभूषेत सजून आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्षम फाऊंडेशन साकोली सेंदूरवाफा अध्यक्ष गोलू धुर्वे, उपाध्यक्ष डॉ. समीर गहाणे, सचिव कृषभ तांडे, महेश शहारे, डॉ. नितीन गुप्ता, दिपक रहांगडाले, घनश्याम आगाशे, सपन कापगते, सागर पुस्तोडे, पायल साखरे, शितल तांडे, निकेश सिंग, जीवन कापगते, पुरूषोत्तम बोरकर, हितेश कापगते, विनोद मुंगूलमारे, किशोर बावणे, रोशन कापगते, सागर ठाकरे, भूषण डोंगरवार, भुवन कापगते, मेघराज बोरकर, संजय हातझाडे, समीर लांजेवार, साहिल साखरे, उल्हास कापगते, केतन कापगते, सौरभ लांजेवार, टिकेश डोंगरवार, गिरीश डोंगरवार, मनिष हातझाडे आणि सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.