थायसन व भावना कंपणीनी लावलेल्या करोडो रुपयांच्या कन्व्हटर बेल्टची सखोल चौकशी करावी.

88

थायसन व भावना कंपणीनी लावलेल्या करोडो रुपयांच्या कन्व्हटर बेल्टची सखोल चौकशी करावी.

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि . 16 फेब्रवरी 2023
रिपोर्ट :- जिल्हा संवाददाता, चंद्रपुर

सविस्तर बातमी :- उर्जा निर्मिती साठी कोळसा पुरवठा आसपास खाणीतून केल्या जातो. ते कोळसा पाॅवर स्टेशन पर्यंत पोहचविण्यासाठी कन्व्हटर बेल्टचा वापर केला जातो.त्या बेल्ट साठी करोडो रुपये खर्च केले जातात. याच बेल्टसाठी थायसन व भावना या कंपनीला करोडो रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.आता नुकताच कोळसा वाहून नेण्याचे कामे चालू असतांनाच कन्व्हटर बेल्ट तुटल्याने करोडो रुपयांचे नुकसान शासनाचे झाले आहे.या कंपनीने करोडो रुपयांच्या कन्व्हटर बेल्टवर थातूरमातूर कामे करण्यात आली आहे.त्यामुळे कंत्राटाची मुदत संपण्यापूर्वीच बेल्ट तुटल्याने कोळसा वाहून नेण्याचे काम बंद पडले आहे.त्यामुळे विज निर्मिती खंडीत पडली आहे.यावेळी महाजनकोचे अधिकारी कर्मचारी व कंपणीचे कर्मचारी कार्यरत असतात त्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच हा अनर्थ घडला आहे.

और न्यूज पढ़ें 👇👇👇


गववंश तस्करों पर LCB स्थानीय गुनाह शाखा की बड़ी कार्यवाही,


वीडियो गेम पार्लर पर कार्रवाई करें पत्रकार संघ की मांग.!


तरी महोदय आपणास नम्र विनंती आहे, की थायसन व भावना कंपणीनी लावलेल्या करोडो रुपयांच्या कन्व्हटर बेल्टची सखोल चौकशी करावी, कन्व्हटर बेल्टची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी,थायसन व भावना कंपणीला काळ्या यादीत टाकण्यात यावा, वरीष्ठ स्तरावरून चौकशी करावी व दोषीवर १० दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परीणामास सर्वस्वी आपला विभाग जबाबदार राहील.