सी एस टी पी एस (CSTPS) मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा: राजेश बेले
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 15 फेब्रवरी 2023
रिपोर्ट:- जिल्हा संवाददाता, चंद्रपुर
सविस्तर बातमी:- चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर परिसरात महापारेषण कार्यालयासमोर विद्युत केंद्रातील कर्मचार्यांनी वृक्षांची केली. बदाम, करंजी या प्रकारच्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. यापूर्वी पण अनेकदा सीएसटीपीएस परिसरातील वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणाला वातावरणाचे खूप मोठे नुकसान होत आहे. सीएसटीपीएस मानवी जीवनाला घातक वायू प्रदूषण जलप्रदूषण करीत आहे तरीसुद्धा या प्रकारचे कृत्य करून झाडाची कत्तल करणे शुद्ध हवामान नष्ट करणे याकरीता जवाबदार म्हणून सिएसटिपीएसचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केलेली आहे त्या अनुषंगाने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मोका पंचनामा करून पाहणी केली असता त्या वृक्षाची साल काढून त्या वृक्षाला नष्ट करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. त्याची छाती गोलाई घेतली. करंजी वृक्ष १५० सेमी बदामीचे वृक्ष १९५ सेमी चे आहे. सदर झाडाची मोका चौकशी व पंचनामा करून गुन्हा नोंद केला. सदर घटनास्थळी चतुर सीमा घेण्यात आल्या त्यावेळी पंच म्हणून महापारेषणचे सुरक्षारक्षक सचिन गावडे, साईद अहमद याच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. पंचनामा करतेवेळी वन क्षेत्र दुर्गापूर आर पी तिजारे व वनरक्षक दुर्गापुर डीपी दहेगावकर उपस्थित होते.
और न्यूज पढ़ें 👇👇👇
सदर घटनास्थळी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले व सी एस टी पी एस चे सिव्हिल इंजिनिअर कुराडे उपस्थित होते. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी वृक्षाच्या कत्तलीला जवाबदार सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.