साकोलीत चक्रवर्ती राजाभोज जयंती संपन्न क्षत्रीय पोवार समाज संघटनेचे आयोजन

112

साकोलीत चक्रवर्ती राजाभोज जयंती संपन्न

क्षत्रीय पोवार समाज संघटनेचे आयोजन

 

साकोली / महाराष्ट्र
दि. १२ फेब्रुवारी – २०२३
रिपोर्ट : आशिष चेडगे संवाददाता
ग्लोबल महाराष्ट्र न्यूज •

• सविस्तर बातमी साकोली : क्षत्रीय कुलवंशज चक्रवर्ती राजाभोज जयंती निमित्त येथील नागझिरा रोडवर क्षत्रीय पोवार समाज भवन नियोजित चक्रवर्ती राजाभोज स्मारक स्थळ ( १२ फेब्रु.) ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथे याप्रसंगी ध्वजपुजन आणि ध्वजारोहण संपन्न झाले. यात सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

और न्यूज पढ़ें 👇👇


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चा राजीनामा मंजूर.!


साकोलीत विदर्भस्तरीय दोन दिवसीय “बि-हाड परिषद” महोत्सवाला सुरुवात


 

कार्यक्रमात प्रमुख अतिथी पंचायत समिती गटविकास अधिकारी के.डी. टेंभरे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव पारधीकर, देवनाथ रहांगडाले, पवनकुमार शेंडे, ऍड. सुरेश पटले, रमेश रहांगडाले, चेतन राणे, राजेश पटले, खेमराज टेंभरे, माजी जि.प.स. छाया पटले, माजी सरपंच भिमावती पटले, प्रा. भागचंद परीहार, सरपंच केमेश्वरी टेंभरे व अन्य मान्यवर मंचावर होते. कार्यक्रमात दिप प्रज्वलन, क्षत्रीय कुलवंशज ध्वजपुजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की क्षत्रीय पोवार समाज संघटनेने एकत्र येऊन आपला समाज विविध नविन योजनात्मक कार्यप्रणालीकडे आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अग्रेसर असणे आवश्यक आहे. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्षत्रीय पोवार समाज संघटनेचे गिरीश रहांगडाले, हिरालाल पारधीकर, से.नि.मेजर घनश्याम पटले, डॉ. ओमेंद्र येळे, लिलाधर पटले, टि.आय. पटले, आत्माराम पटले, प्रल्हाद पटले, सुनील पटले, पुरूषोत्तम पारधीकर, बिपीन ठाकूर, प्रकाश रहांगडाले, महिला समितीचे ऍड. प्रतिमा येळेकर, सपना पटले, दयमंता ठाकरे, माया पारधी, नंदा पारधी, सरपंच माधूरी कटरे, सावित्री बोपचे आणि सर्व समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले. संचालन अनिल टेंभरे यांनी तर आभार प्रदर्शन ऍड. अनिल पटले यांनी केले.